शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
5
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
6
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
7
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
8
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
9
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
10
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
11
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
12
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
13
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
14
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
15
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
16
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
17
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
18
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
19
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: अर्थसंकल्पावर २.४१ तास भाषण करूनही अपुरेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 04:29 IST

निर्मला सीतारामन अस्वस्थ; रक्तातील साखर पातळी राखण्यास खावे लागले गोड

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी-२ सरकारचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला व त्यांचे त्यावरील भाषण आतापर्यंतचे सगळ्यात प्रदीर्घ ठरले. अर्थसंकल्प तब्बल दोन तास ४१ मिनिटे सलग वाचून दाखविल्यावरही सीतारामन तो पूर्ण करू शकल्या नाहीत. शेवटी त्यांनी अर्थसंकल्पाच्या शेवटचा टप्पा लोकसभा अध्यक्षांकडे तो न वाचताच सभागृहात मांडला, असे मानले जावे, अशी विनंती केली.

सीतारामन यांना भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या गळ्याने साथ दिली नाही. त्यावेळी त्या आरोग्य कराचे वाचन करीत होत्या. सलग दोन तास ४१ मिनिटे उभे राहून अर्थसंकल्प वाचल्यामुळे सीतारामन यांचा रक्तदाब कमी झाला व त्यांच्या कपाळावर घामही आला. त्या अस्वस्थ झाल्या, तेव्हा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी त्यांच्याकडे पाण्याचा ग्लास दिला. रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी त्यांना गोडही दिले गेले.

पाणी पिऊन सीतारामन यांनी भाषण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. त्यांच्या शेजारी बसलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह त्यांंना खाली बसण्याचा सल्ला देताना दिसले. त्यांनी सभागृहाला फक्त दोन पानेच बाकी असल्याचे सांगितले. सीतारामन यांनी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने ती पाने वाचली आहेत, असे समजून सभागृहात ठेवली.

सीतारामन यांनी इंग्रजीत केलेल्या भाषणात उर्दू, हिंदी, संस्कृत भाषेतील अवतरणेही वाचली आणि चाणक्य नीतीच्या सूत्रांचाही उल्लेख केला. देशाच्या दुसऱ्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना सलग दोन तास १७ मिनिटे भाषण केले. त्या आधी मोदी सरकार-एकमध्ये अर्थमंत्री असलेले अरुण जेटली यांनीही सलग दोन तास १० मिनिटे अर्थसंकल्पाचेभाषण केले होते.

काश्मिरी कवितेचे वाचन

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी पंडित दीनानाथ कौल नदीम यांनी काश्मिरीत लिहिलेली कविताही त्यांनी वाचून तिचा अनुवादही केला. त्या म्हणाल्या, ‘आमचा देश बहरतो तो शालिमार बागेसारखा, आमचा देश दाल सरोवरात फुललेल्या कमळाच्या फुलासारखा, नवयुवकांच्या उसळत्या रक्तासारखा माझा देश, तुमचा देश, माझा देश, जगात सगळ्यात प्रिय देश.’

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन