शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: तुमचा पीएफ कापला जातो? मग जाणून घ्या नवे नियम; अन्यथा बसेल फटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 21:08 IST

द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज बजेट सादर केलं आहे.

ठळक मुद्देबजेटच्या माध्यमातून निर्मला सीतारामण यांनी कराच्या टप्प्यात बदल केलेला आहे. आतापर्यंत जास्त पगार असलेल्या व्यक्तींना भविष्य निर्वाह निधी (EPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)च्या योजनांमधून प्राप्तिकरात सूट मिळत होती. जर तुमचं वार्षिक गुंतवणुकीतलं योगदान 7.5 लाखांच्या वर आहे आणि आपण भविष्य निर्वाह निधी (EPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS), Superannuation फंड अंतर्गत गुंतवणूक केलेली असल्यास प्राप्तिकर द्यावा लागणार आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज बजेट सादर केला आहे. बजेटच्या माध्यमातून निर्मला सीतारामण यांनी कराच्या टप्प्यात बदल केलेला आहे. आतापर्यंत जास्त पगार असलेल्या व्यक्तींना भविष्य निर्वाह निधी (EPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)च्या योजनांमधून प्राप्तिकरात सूट मिळत होती. पण ती सूट मोठ्या पगारदारांना मिळणं बंद होणार आहे. जर तुमचं वार्षिक गुंतवणुकीतलं योगदान 7.5 लाखांच्या वर आहे आणि आपण भविष्य निर्वाह निधी (EPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS), Superannuation फंड अंतर्गत गुंतवणूक केलेली असल्यास प्राप्तिकर द्यावा लागणार आहे. तत्पूर्वी अशा योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांतून सूट मिळत होती. 1 एप्रिल 2021मध्ये याची अंमलबजावणी होणार असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी सांगितलं आहे. समजा आपलं वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपये आहे. त्या 30 लाखांपैकी पीएफमध्ये 3.60 लाखांचं योगदान दिलं. तसेच NPSमध्ये 3 लाखांचं योगदान, Superannuation फंडात 1.50 लाखांचं योगदान, अशी एकूण गुंतवणूक 8.10 लाखांच्या घरात जाते. त्यामुळे या सर्व रकमेवर तुमच्याकडून वार्षिक 60 हजारांचा कर आकारला जाणार आहे. नवे टॅक्स स्लॅब ऐच्छिक असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. एखाद्या व्यक्तीला या सुविधांचा लाभ घ्यायचा असल्यास त्याला आतापर्यंत मिळणाऱ्या सवलती सोडाव्या लागतील.विम्याचे हप्ते, गुंतवणूक, घर भाडं, मुलांचं शैक्षणिक शुल्क यासारख्या 70 मुद्द्यांच्या आधारे प्राप्तिकरात सवलत मिळते. मात्र नव्या टॅक्स स्लॅबचा फायदा घ्यायचा असल्यास त्यांना या सवलतीवर पाणी सोडावं लागेल. याआधी प्राप्तिकर भरताना या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्यावर करात सवलत मिळत होती.  एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 7.5 लाख रुपये असल्यास त्याला सध्या 50 हजार रुपयांचा कर भरावा लागतो. मात्र नव्या टॅक्स स्लॅबनुसार त्याला केवळ 25 हजार रुपयेच कर भरावा लागेल.सध्याच्या नियमांनुसार संबंधित व्यक्ती विम्याचे हप्ते, गुंतवणूक, घर भाडं, मुलांचं शैक्षणिक शुल्क यासारख्या 70 मुद्द्यांची माहिती देत असल्यास त्याला सवलत मिळते. ही सवलत घेऊन भराव्या लागणाऱ्या कराची रक्कम 25 हजारांपेक्षा खाली येत असल्यास जुनाच टॅक्स स्लॅब फायदेशीर ठरू शकतो. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही संबंधित व्यक्तीला 25 हजारांपेक्षा जास्त कर भरावा लागत असल्यास त्याच्यासाठी नवा टॅक्स स्लॅब जास्त फायदेशीर ठरेल. नव्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरताना त्याला कागदपत्रांची पूर्ततादेखील करावी लागणार नाही.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीbudget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषण