शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

Budget 2019: उघडली घोषणांची बरणी; निवडणुकीआधी मोदींची ‘मत’पेरणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:56 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेवटच्या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतपेरणी करत लोकानुनयी घोषणांचा पाऊस पाडला.

नवी दिल्ली : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेवटच्या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतपेरणी करत लोकानुनयी घोषणांचा पाऊस पाडला. ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राला ‘सबकी खुशी’ची जोड देत शेतकरी, मध्यमवर्गीय, नोकरदार, असंघटित कामगार यांच्यासह देशातील सुमारे ५५ कोटी जनतेला मोठा दिलासा देणाऱ्या अनेक योजना वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केल्या.या अर्थसंकल्पात दिलेली आश्वासने आपण पूर्ण करू शकलेलो नाही, याची स्पष्ट कबुली देण्याऐवजी गतकाळात आपण कशी भरीव कामगिरी केली गेली, याचा पाढा वाचला गेला. मात्र, त्यासोबतच केल्या गेलेल्या नव्या घोषणा भूतकाळातील अपयशावर पांघरूण घालणाºया होत्या. विरोधी पक्षांनी अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पावर टीका केली. मात्र, सरकारने राजकीय स्वार्थापोटी केलेल्या खैरातीने सर्वसामान्य जनतेमध्ये स्वागताचा सूर उमटला. या सर्व घोषणांचे खुद्द मोदींसह सर्वच सत्ताधारी सदस्यांनी प्रदीर्घकाळ बाके वाजवत सभागृह दणाणून सोडले. या जल्लोषात ‘मोदी, मोदी’ असा अखंड घोष सुरू होता. त्याने लोकसभेत राजकीय सभा सुरू असल्याचा भास झाला. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या १२ कोटी मध्यम आणि अल्पभूधारक शेतकºयांना वर्षाला सहा हजार रुपयांची रोख मदत देण्याची ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजना आणि देशातील १० कोटी असंघटित कामगार व स्वयंरोजगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन देण्याची ‘प्रधानमंत्री श्रम-योगी मानधन योजना’ हे या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य ठरले.अशा प्रकारच्या योजना देशपातळीवर राबविल्या जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचे श्रेय सरकारने घेतले. या खालोखालची भपकेबाज घोषणा होती वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना प्राप्तिकरातून पूर्ण माफी देण्याची. यामुळे देशातील सुमारे तीन कोटी करदात्यांना एक पैसाही कर भरावा लागणार नाही, असा दावा वित्तमंत्र्यांनी केला. नोकरदारांना वरकरणी सरकारने छप्पर फाडके दिल्याचा आनंद झाला, पण प्रत्यक्षात कराचे दर आणि उत्पन्नाचे स्लॅब यात कोणताच बदल केलेला नसल्याने करपात्र उत्पन्न एक रुपयाने जरी पाच लाखाच्या वर गेले, तर याचा लाभ मिळणार नाही, हे करतज्ज्ञांनी लक्षात आणून देताच अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. तीन कोटी करदात्यांना मिळून दिलेली १८,५०० कोटी रुपयांची करसवलत हा प्रत्यक्षात डोंगर पोखरून निघालेला उंदीर ठरला.तुटीची मर्यादा ओलांडावीसत्तेवर आल्यास देशातील सर्व गरिबांना किमान उत्पन्न हमी योजना राबविण्याची घोषणा राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात केल्याने सरकारने शेतकºयांची ही योजना ऐनवेळी यात घुसडली, असा दावा काँग्रेसने केला. यात कदाचित तथ्य असावे. कारण या योजनेसाठी ९५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागल्याने वित्तीय तुटीची ३.१ टक्क्याची ठरलेली मर्यादा ओलांडावी लागली, अशी कबुली स्वत: पीयूष गोयल यांनीच दिली.‘हाउ इज द जोश’गोयल यांनी ‘उरी’ चित्रपटाचा उल्लेख केला, तेव्हा मागेच बसलेले राजवर्धन राठोड, अन्य मंत्री व खासदार ‘हाउ इज द जोश’च्या घोषणा देऊ लागले. लोकसभेच्या स्क्रीनवर या वेळी अचानक खासदार परेश रावल यांचा चेहरा दिसू लागला. या चित्रपटात रावल यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भूमिका केली आहे. घोषणाबाजीत मनमुराद हास्य पेरत किरण खेरही सहभागी झाल्या.नवे स्वप्न दाखविले..!मुदत संपत आलेल्या सरकारने फक्त लेखानुदान मांडावे हे संकेत मोडीत काढत, मोदी सरकारने निवडणूक जाहीरनाम्याच्या थाटात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. एवढेच नव्हे, तर सन २०३० पर्यंत गरिबी, कुपोषण, अस्वच्छता आणि निरक्षरतेपासून मुक्त अशा आधुनिक भारताची उभारणी करण्याचे नवे स्वप्नही त्यात दाखविले गेले.गेल्या चार वर्षांत देशात पारदर्शी विकासगंगा वाहू लागली आहे व सुखी आणि समृद्ध भारतासाठीची पायाभरणी करण्यात आली आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प त्याच भव्य इमारतीच्या उभारणीतील एक वीट आहे, असे गोयल म्हणाले.आमच्या नेत्याची नीयत साफ, धोरण स्पष्ट आणि सचोटी अटळ असल्याने आम्ही भारताला जगातील अव्वल देश नक्की बनवू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.संरक्षण दलांसाठी प्रथमच तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणाही अशीच फसवी बढाई होती. गेल्या वर्षीची तरतूद २.९५ कोटी रुपये होतीच. ती फक्त पाच हजार कोटींनी वाढवून तीन लाख कोटींचा टप्पा गाठला गेला.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९