शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: 'डीअर नमो, शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देणारं बजेट हा बळीराजाचा अपमानच!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:35 IST

Budget 2019: मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला.

नवी दिल्ली - अर्थमंत्री पियुष गोयल यांनी यंदाचा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तर, शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये देण्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींच्या अर्थसंकल्पावर टीका केली असून शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये देणं हे सरकारचा अपमान असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. 

मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला. यंदाचा अर्थसकल्प मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे. तर, 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मोदी सरकारने सर्वसामान्य नोकरादारांनाही आनंदाचा धक्का दिलाय. तसेच शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेऊन हा अर्थसंकल्प मांडला.  सरकारने या अर्थसंकल्पातून लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला.

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले आहे. मात्र, राहुल गांधींनी मोदी सरकारची ही योजना शेतकऱ्यांचा अपमान करणारी असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. मोदी सरकारने गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना दररोज 17 रुपये देणं हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचंही राहुल यांनी म्हटलंय. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBudget 2019अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी