शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Budget 2019 : गरिबांना समर्पित असलेला अर्थसंकल्प - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:20 IST

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देभाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे.आयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'गरीब व वंचित जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना देखील ६ हजार रुपये प्रतिवर्षाला देण्याची घोषणा केल्याने एक मोठे पाठबळ मिळाले आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे. देशातील मध्यमवर्ग विविध समस्यांचा सामना करत असतो. आयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे' असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

'उच्चमध्यमवर्गीय नागरिकांचेदेखील समाधान झाले आहे' 40 ते 50 कोटी लोकांना तर थेट फायदा होणार आहे. माझ्या खात्यालादेखील भरीव योगदान दिले आहे. देशातील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम हे जगातील क्रमांक एकचे झाले आहे. नव्या भारताकडे आपण जात आहोत. सुखी, समृद्ध, अत्याधुनिक भारताकडे वेगाने प्रवास सुरू झाला आहे. नवीन भारताचा संकल्प या अर्थसंकल्पाद्वारे मांडण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मांडलेल्या या अर्थसंकल्पाचे जनता समर्थन करेल. केवळ निवडणूकीच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहणे योग्य ठरणार नसल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
  • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
  • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
  • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
  • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
  • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
  • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
  • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
  • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
  • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं
टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा