शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : भारताला ‘आयुष्यमान’ कवच, ५० कोटींहून अधिक नागरिक आरोग्य विम्याच्या छत्राखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 04:22 IST

देशातील सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणून भारतीय अर्थव्यवस्थेला ‘सामाजिक सुरक्षा व्यवस्थे’चे भक्कम कवच देण्याच्या दिशेने पहिले दमदार पाऊल टाकणा-या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला ‘आयुष्यमान भारता’चे नवे प्रतिकवच बनवले आहे.

देशातील सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणून भारतीय अर्थव्यवस्थेला ‘सामाजिक सुरक्षा व्यवस्थे’चे भक्कम कवच देण्याच्या दिशेने पहिले दमदार पाऊल टाकणाºया अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला ‘आयुष्यमान भारता’चे नवे प्रतिकवच बनवले आहे. या वर्षी प्रथमच अर्थसंकल्पात आरोग्य योजनेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला असून, ‘स्वस्थ भारत, समृद्ध भारत’च्या दिशेने जाण्यासाठी हे आवयक आहे, असे अरुण जेटली म्हणाले.देशातल्या १० कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयांच्या आरोग्यविम्याचे संरक्षण देऊ करणारी ही योजना जगातली सर्वांत मोठी आणि व्यापक सरकार पुरस्कृत आरोग्यविमा योजना असल्याचेही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले.दहा कोटी कुटुंबातल्या किमान पन्नास कोटी नागरिकांना, म्हणजे सुमारे निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विम्याचे संरक्षण देणाºया या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर दोन ते अडीच लाख कोटी रुपयांचा भार पडेल, असेही ते म्हणाले.याखेरीज नागरिकांना घरपोच आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी देशात दीड लाख आरोग्य सुविधा केंद्रे स्थापन करण्याची योजनाही प्रस्तावित आहे. निमशहरी, ग्रामीण व दुर्गम भागांत अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि सल्ला पोहोचविण्याचे काम ही केंद्रे करतील. त्यासाठी अर्थसंकल्पात बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधे मोफत मिळतील. शिवाय गरोदर स्त्रियांसाठी प्रसूती-साह्य, आरोग्य-तपासणी व सल्ला सुविधाही असतील. बड्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करून ही केंद्रे दत्तक घ्यावीत आणि समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनीही त्यांच्या उभारणीत हातभार लावावा यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य कार्यक्रमाला आवश्यक बळ मिळावे यासाठी देशात २४ नवी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. दर तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मिळून किमान एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न असे सुसज्ज हॉस्पिटल असेल, या पद्धतीने हे नियोजन केले जाईल. सुसज्ज रुग्णालयांची ही साखळी उभारण्यासाठी सध्याच्या जिल्हा आरोग्य केंद्रांनाही नवसंजीवनी दिली जाणार आहे.आजारपणाचा सामना करताना मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो वा घरातील वस्तू विकण्याची वेळ येते. तसे होऊ नये याची काळजी ‘आयुष्यमान भारत’ अभियानातल्या या योजना उचलतील. या योजनांमधून लाखो रोजगारांची निर्मिती होईल आणि त्यातला मोठा वाटा स्त्रियांना मिळेल असा दावा त्यांनी केला.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८IndiaभारतHealthआरोग्य