शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

budget 2018 : ऊर्जा क्षेत्रासाठी १३,८८१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 5:18 AM

मेक इन इंडिया मोहीम अधिक सुलभ करण्यासाठी ऊर्जा, कोळसा, नवीन आणि पुनर्वापर करता येणारी ऊर्जा, खाणी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत अर्थसंकल्पात दिले आहेत.

मेक इन इंडिया मोहीम अधिक सुलभ करण्यासाठी ऊर्जा, कोळसा, नवीन आणि पुनर्वापर करता येणारी ऊर्जा, खाणी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत अर्थसंकल्पात दिले आहेत. या क्षेत्राशी संबंधित सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग अधिक स्पर्धाक्षम व्हावेत, यासाठी ५0 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी कॉर्पोरेट करात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. ग्रामीण मंत्रालयासाठीच्या तरतुदीत ३३ टक्के वाढ करून ती १३,८८१ कोटी रुपये करण्यात आली आहे.येत्या वर्षात आणखी २0 हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे. सोलर टेम्पर्ड ग्लासवरील सीमा शुल्क आणि अबकारी करात कपात किंवा रद्द करून तसेच सौरऊर्जेसाठी लागणाºया कच्च्या मालावरील करामध्ये कपात करून हे लक्ष्य साध्य करण्यात येईल. रेल्वे ७ हजार रेल्वे स्थानके सौरऊर्जेने उजळवणार आहे. आॅफग्रीड सौरऊर्जेसाठी २०१७-१८साठीच्या तरतुदीत २१ टक्क्यांनी वाढ करून ती ८४९ कोटी रुपये केली आहे. २०२२पर्यंत १०० गीगावॅट छतावरील सौरऊर्जा निर्माण करून देशाची ४० टक्के ऊर्जेची गरज भागविण्याचे लक्ष्य आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या तरतुदीत ४४ टक्के वाढ करून ४,८१४ कोटी केली आहे. शहरी भागासाठीच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची तरतूद ४,५२४ कोटींवरून ५,८२१ कोटींवर नेण्यात आली आहे. ही वाढ २९ टक्के आहे. १ मे २0१८पर्यंत देशातील १00 टक्के गावांत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे या अर्थसंकल्पावरून स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले.स्वदेशी एलईडी कंपन्यांना सीमा शुल्कात ५ टक्के कपातस्वदेशी एलईडी कंपन्यांना चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात पावले उचलण्यात आली आहेत. एलईडी उत्पादनासाठी लागणाºया सर्व सुट्ट्या भागांवरील पायाभूत सीमा शुल्क १0 टक्क्यांवरून५ टक्के करण्यात आले आहे. बल्बसाठी लागणाºया सुट्ट्या भागांवरील अबकारी करही कमी केला आहे. एलईडीसाठी लागणाºया सुट्ट्या भागांची आयात करून एलईडी बल्ब आणि ट्युब्ज तयार करण्याचे प्रमाण मोठे आहे.दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना 4814कोटीएकात्मिक ऊर्जा विकास योजना 5821कोटी

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018