शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बसपा प्रमुख मायावती यांच्या वडिलांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 19:59 IST

मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते.

ठळक मुद्देमायावतींना आयएएस बनवण्याची होती इच्छा.मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. मायावती आणि त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण दिल्ली येथेच झाले.

लखनौ/ नवी दिल्‍ली - बसपा प्रमुख मायावती (BSP Supremo Mayawati) यांचे वडील प्रभू दयाल (Prabhu Dayal) यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. प्रभू दयाल यांच्या निधनानंतर बसपाचे राष्‍ट्रीय महासचिव आणि राज्‍यसभा खासदार सतीश चंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. दयाल हे दिल्लीतील रकाबगंज येथे राहत होते. उद्या दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

मायावतींना आयएएस बनवण्याची होती इच्छा -मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे शिफ्ट झाले होते. यानंतर मायावती आणि त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण दिल्ली येथेच झाले. मायावती यांना आयएएस अधिकारी बनवण्याची प्रभू दयाल यांची इच्छा होती. मात्र, बसपा संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर मायावती यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही झाल्या होत्या.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त करत, ''उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतीजी यांचे वडील श्री प्रभू दयालजी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. मी मायावती तथा त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. प्रभू श्री रामांना प्रार्थना आहे, की दिवंगत आत्म्याला आपल्या श्री चरणांत स्थान द्यावे. ॐ शांती!'', असे ट्विट केले आहे.  

मिशन 2022च्या तयारीत बसपा -बसपा प्रमुख मायावती यांनी नुकताच पक्षात मोठा बदल केला आहे. मऊचे भीम राजभर (Bheem Rajbhar) यांच्याकडे त्यांनी उत्तर प्रदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा दिली आहे. मायावती यांच्या या निर्णयाकडे 2022 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने बघितले जात आहे.

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ