शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 09:37 IST

...तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत

ठळक मुद्देदुपारी 1 वाजता अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील.बसपाच्या या ब्राह्मण सम्मेलनावरून वादही निर्माण झाला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मायावतींनी राजकीय खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेशात जातीय समिकरण साधण्यासाठी आजपासून बसपा संपूर्ण राज्यात ब्राह्मण सम्मेलनाचे आयोजन करत आहे. विशेष म्हणजे रामाची नगरी असलेल्या अयोध्येतून ब्राह्मण सम्मेलनांची सुरुवात होत आहे. बसपा सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. अयोध्येनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, अशा प्रकारच्या सम्मेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. (BSP convention in ayodhya today ahead of assembly election in up)

दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण -दुपारी 1 वाजता अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. यानंतर सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील. मायावतींनी 2007 मध्ये विधानसभा निवडणुकीत दलित आणि ब्राह्मण मतांवर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत.

या ठिकाणी पेच -बसपाच्या या ब्राह्मण सम्मेलनावरून वादही निर्माण झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांवर आणि रॅलींवर बंदी घातली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 11 जुलै 2013 रोजी मोती लाल यादव यांनी दाखल केलेल्या पीआयएल क्रमांक 5889 वर सुनावणी करताना उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांची जातीय आधारावरील सम्मेलने, रॅली आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घातली होती. 

जस्टिस उमानाथ सिंह आणि जस्टिस महेंद्र दयाल यांच्या डिव्हिजन बेंचने निर्णय देताना म्हटले होते, की राजकीय पक्षांच्या जातीय सम्मेलनांमुळे समाजात मतभेद वाढतात आणि निष्पक्ष निवडणुकीलाही अडथळा निर्माण होतो. 

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणElectionनिवडणूक