शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'सीएए'ला पाठिंबा; मायावतींनी केली आमदाराची पक्षातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:34 IST

बहुजन समाज पक्षाच्या आमदाराला नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणे महागात पडले.

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी आपल्या पक्षातील आमदार रमाबाई परिहार यांना निलंबित केलं आहे. परिहार यांना पक्षाच्या आदेशाकडे  दुर्लक्ष करण्याबाबत या आधीच सूचना देण्यात आली होती. मात्र त्यांनतर पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे मायावती यांनी जाहीर केले आहे.

एकीकडे नागरिकत्व कायद्यासंदर्भात संपूर्ण देशात वादविवाद आणि हिंसाचार सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून सतत विरोध होत आहे. मात्र असे असले तरीही काहीजण या काद्याद्याच्या समर्थनात घोषणाबाजी करत असून अनेक ठिकाणी रॅली काढण्यात येत आहे.

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या आमदाराला नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणे महागात पडले. मध्य प्रदेशातील पठारा विधानसभा मतदार संघातून बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांना नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याप्रकरणी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी निलंबित केलं आहे.

मायावती यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, नागरिकत्व कायदा असंवैधानिक असल्याचे व त्याला विरोध करण्याची भूमिका सर्वप्रथम बहुजन समाज पक्षाने घेतली होती. तसेच आमच्या पक्षाने संसदेमध्येही याविरोधात मतदान केले व माघार घेण्याबाबत राष्ट्रपतींना निवेदन सुद्धा दिले. मात्र असे असून सुद्धा आमदार रमाबाई परिहार यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करत असल्याचे मायावती यांच्याकडून सांगण्यात आले आहे.