शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापी वादावर मायावतींचे मोठे विधान; म्हणाल्या, "धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:57 IST

Gyanvapi Masjid Case : लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे हे सुनियोजित कारस्थान असल्याचे मायावती म्हणाल्या. यासोबतच त्यांनी जनतेला बंधुभाव जपण्याचे आवाहनही केले आहे. 

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) मुद्द्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून आता बसपाच्या प्रमुख मायावती यांनी भाष्य केले आहे. मायावती यांनी हे एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे हे सुनियोजित कारस्थान असल्याचे मायावती म्हणाल्या. यासोबतच त्यांनी जनतेला बंधुभाव जपण्याचे आवाहनही केले आहे. 

ज्ञानवापीबाबत सुरू असलेल्या वादावर मायावती म्हणाल्या की, ज्याप्रकारे षडयंत्रा अंतर्गत लोकांच्या धार्मिक भावना भडकवल्या जात आहेत, तर भाजपला आपला देश कोणत्या गोष्टींवर मजबूत होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच, विशेषत: धार्मिक समुदायाशी संबंधित असलेल्या ठिकाणांची नावेही एकामागून एक बदलली जात आहेत. यामुळे आपल्या देशात केवळ शांतता, सौहार्द आणि बंधुभावच नाही तर परस्पर द्वेषाची भावना निर्माण होईल. हे सर्व खूपच चिंताजनक आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, जनतेला आवाहन करत मायावती म्हणाल्या की, यापासून देशातील सर्वसामान्य जनता आणि सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यातून ना देशाचा फायदा होणार आहे, ना सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. याशिवाय, बसपाकडून या प्रकरणी जनतेला आवाहन आहे की, त्यांनी परस्पर बंधुभाव जपावा, असेही मायावती यांनी सांगितले. 

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील वादावर मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (SC) राज्य सरकारला मशिदीच्या आवारातील ज्या ठिकाणी हिंदू धर्मानुसार शिवलिंग सापडले आहे, त्या भागाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही मुस्लिमाला तेथे नमाज अदा करण्यापासून रोखले जाणार नाही किंवा अडवणूक केली जाणार नाही, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.पुढील सुनावणी गुरुवारी, १९ मे रोजी होईल.  

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी