शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'देशात शिवाजी महाराजांपासून सरदार पटेलांचे पुतळे, मग माझ्याच पुतळ्यावर आक्षेप का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 10:30 IST

देशात मूर्ती आणि स्मारकं बनविण्याची परंपरा आधीपासून आहे. सरकारी पैसा शिक्षण, रुग्णालये आणि पुतळे  बनविण्यासाठी खर्च करावा की नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही.

नवी दिल्ली - देशात मूर्ती आणि स्मारकं बनविण्याची परंपरा आधीपासून आहे. सरकारी पैसा शिक्षण, रुग्णालये आणि पुतळे  बनविण्यासाठी खर्च करावा की नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही. लोकांना आम्ही प्रेरणा देतो म्हणून स्मारकं बनवतो. लोकांची मागणी होती म्हणून पुतळे उभारण्यात आले. उत्तर प्रदेशात प्रभू राम, मुंबईत शिवाजी महाराज, गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचे पुतळे चालतात. काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी देशभरात सरकारी पैशातून नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.वी नरसिंहराव यांच्या मूर्ती बनवल्या गेल्या त्यावर मिडीया आणि याचिकाकर्त्यांनी कोणतेच प्रश्न उपस्थित केले नाहीत मात्र आमच्यावर विरोध केला जातो असा आरोप मायावती यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. 

बहुजन समाज पार्टीचं निवडणूक चिन्ह हत्ती आणि मायावती यांच्या स्वत: प्रतिमा असलेल्या मुर्तीच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने मायावती यांनी नोटीस पाठवली होती त्यामध्ये मायावती यांनी उत्तर दिलं आहे. 

यामध्ये मायावती यांनी सांगितले की, माझं संपूर्ण आयुष्य दलित आणि मागासवर्गीयांसाठी समर्पित केलं आहे. समाजातील या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच मी लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली होती. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मी ही स्मारके बनवली आहेत. उत्तर प्रदेशात हत्तीचे शिल्प ही केवळ वास्तू आहे त्यातून बसपाचं प्रतिनिधित्व दिसून येत नाही. 

प्रभू राम, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पटेल यांच्या पुतळे का ?गुजरात सरकारकडून 3 हजार करोड रुपये खर्च करुन सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्यात आला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधण्यात आला. उत्तर प्रदेशात योगी सरकारकडून प्रभू रामाची मूर्ती बनविण्यासाठी 200 करोड रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भाजपा आणि काँग्रेस सरकारच्या काळातही जनतेचा पैसा स्मारकासाठी वापरला गेला मग दलित नेत्यांच्या पुतळ्यांवर आक्षेप का असा प्रश्न मायावती यांनी विचारला. काय होतं प्रकरण ?बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी स्वत:ची प्रतिमा असलेले पुतळे लावल्याप्रकरणी जनतेचे पैसे परत करावे अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये लखनऊ आणि नोएडामध्ये मायावती आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेला हत्ती यांचे पुतळे बनविण्यासाठी सरकारी पैसे खर्च केले असा आरोप करण्यात आला होता.  

टॅग्स :mayawatiमायावतीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयStatue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज