शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

अजबच! उमेदवार फरार, नेते आणि कार्यकर्ते करताहेत प्रचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 3:30 PM

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे. दरम्यान येथील एका मतदारसंघात असाही एक उमेदवार आहे जो फरार आहे. मात्र त्याच्या प्रचारासाठी दिग्गज नेते पोहोचत आहेत. तसेच कार्यकर्तेही जोरदार प्रचार करत आहेत. या उमेदवाराचे नाव आहे अतुल राय. सपा-बसपा महाआघाडीचे उमेदवार अतुल राय यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणामध्ये अजामिनपात्र वॉरंट निघालेले आहे. त्यामुळे ते फरारी झाले आहेत. अतुल राय हे उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील घोसी लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याविरोधात एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून वाराणसीमधील लंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर  न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना अतुल राय यांना 23 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. 

 पत्नीची भेट घालून देण्याचा बहाणा करून अतुल रार यांनी लंका येथील फ्लॅटवर नेऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एक तरुणीने केला होता. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बनवलेला व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन अतुल राय यांनी वारंवार शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. दरम्यान, सध्या पोलीस अतुल राय यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अतुल राय यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. सदर तरुणी आपल्या ऑफीसमध्ये येत असे. तसेच निवडणूक लढण्याचा बहाणा करून पैसे उकळत असे. निवडणुकीत उमेदवरा बनल्यानंतर तिने मला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. त्यासंदर्भातील गुन्हा बलियामधील नरही ठाण्यात नोदवलेला आहे, असे अतुल राय यांनी म्हटले आहे. मात्र बसपा आणि अतुल राय यांना सत्तेचा दुरुपयोग करून बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचा आरोप बसपाप्रमुख मायावती यांनी केला आहे. दुसरीकडे अतुल राय हे फरार असल्याने भाजपाकडून त्यांच्याविरोधात आक्रमक प्रचार सुरू आहे. तर फरार उमेदवाराला मतदान कसे करायचे असा प्रश्न मतदारांना पडला आहे. तरीही अतुल राय यांच्या अनुपस्थितीचा मतदानावर परिणाम होणार नसल्याचा दावा सपा-बसपा महाआघाडीकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019ghosi-pcघोसीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीElectionनिवडणूक