नारायणबेट परिसरात बीएसएनएलची सेवा ठप्प

By Admin | Updated: June 12, 2015 17:37 IST2015-06-12T17:37:59+5:302015-06-12T17:37:59+5:30

खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) परिसरामधील नारायणबेट या ठिकाणची बीएसएनएल मोबाईल टॉॅवरची गेल्या दोन महिन्यांपासून सेवा बंद असल्याने बीएसएनएल ग्राहकांना संपर्क होण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.

BSNL service jam in Narayanbet area | नारायणबेट परिसरात बीएसएनएलची सेवा ठप्प

नारायणबेट परिसरात बीएसएनएलची सेवा ठप्प

र : देऊळगावगाडा (ता. दौंड) परिसरामधील नारायणबेट या ठिकाणची बीएसएनएल मोबाईल टॉॅवरची गेल्या दोन महिन्यांपासून सेवा बंद असल्याने बीएसएनएल ग्राहकांना संपर्क होण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
बीएसएनएल सेवेचा वापर करणारे मोबाईलधारक हे टॉवर बंद पडणार असल्याच्या अफवेमुळे चिंतेत पडले आहेत. श्री क्षेत्र नारायण बेट परिसरातील टॉवरवर देऊळगावगाडा, पडवी, बेटपाटी, बारवकरवाडी, शितोळेवस्ती, खोरचा काही भाग तसेच विविध वाड्या, वस्त्यांना या टॉवर लाईनचा पुरवठा होत असतो. या परिसरामध्ये सर्वात जास्त ग्राहक हे बीएसएनएलचे असल्याने आता हा टॉवरच बंद होणार असल्याच्या अफवेमुळे ग्राहक अधिकच चिंतेत पडला आहे. बीएसएनएल अधिकार्‍यांना येथील ग्रामस्थांनी विचारले असता ते फक्त उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळी होत असल्याचे चित्र आहे. मात्र, अद्यापपर्यंत ठोस पाऊले उचलत नसल्याने बीएसएनएलधारक ग्राहकांनी एकदाचीच सेवा कायम स्वरुपाची बंद करुन टॉवर हलवण्याची मागणी केली आहे.

फोटोओळ : नारायणबेट (ता. दौंड) परिसरातील बीएसएनएलचा टॉवर सध्या बंद अवस्थेत आहे (छायाचित्र : रामदास डांेबे)

12062015-िं४ल्लि-02
*-*--------------

Web Title: BSNL service jam in Narayanbet area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.