शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

BSF VIDEO: कडाक्याची थंडी अन् चहुबाजूने बर्फ; पाहा बीएसएफ जवानाचा जोशाने भरलेला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:20 IST

BSF VIDEO: व्हिडीओमध्ये बीएसएफचा जवान कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फाच्छादित भागात पुश अप करताना दिसत आहे. हा जवान अवघ्या 40 सेकंदात 47 पुश अप मारतो.

नवी दिल्ली: परिस्थिती कशीही असो, भारतीय सुरक्षा दलांचा (Indian Security Forces)  उत्साह नेहमीच उंचावलेला असतो. प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे रक्षण करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय असते. बर्फाळ भागातून सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत जवानाचा जोश पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जवानाचा हा व्हिडिओ बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन (@BSF_India) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक बीएसएफ जवान कडाक्याच्या थंडीत बर्फाळ भागात कसरत करताना दिसत आहे. कठीण परिस्थितीतही जवानाची चपळता पाहून सर्वजण त्या जवानाच्या जोशाचे कौतुक करत आहेत.

40 सेकंदात 47 पुशअप

व्हिडीओमध्ये बीएसएफचा जवान कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फाच्छादित भागात पुश अप करताना दिसत आहे. हा जवान अवघ्या 40 सेकंदात 47 पुश अप मारतो. यावरुन तुम्हाला सैनिकांच्या फिटनेस लेव्हलची कल्पना येऊ शकते. बीएसएफने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले- 40 सेकंद 47 पुश अप्स! फिट इंडिया चॅलेंज. ही व्हिडिओ क्लिप 31 हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. कडाक्याच्या थंडीत जवानाने ज्या वेगाने पुश-अप केले त्याचे लोक कौतुक करत आहेत.

यापूर्वीही शेअर केला व्हिडिओबीएसएफने याआधी आणखी एका जवानाचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो बर्फाळ भागात एका हाताने पुश-अप करताना दिसत आहे. त्याने हातात ग्लोव्हजही घातले नव्हते. या व्हिडिओवर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले- 'त्याचे सामर्थ्य धैर्य पाहून प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे.' 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलDefenceसंरक्षण विभाग