शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ये देश है मेरा... घर जळालेल्या जवानाला BSF कडून 10 लाखांची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:06 IST

मोहम्मद अनिस हे बीएसएफमध्ये सेवेत असून ते सध्या ओडिशा येथे कार्यरत आहेत

नवी दिल्ली - दंगलीच्या भीषण आगीत होरपळणल्यानंतर आता राजधानी दिल्लीतील जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, दिल्लीत उफाळलेल्या जातीय द्वेषाच्या आगीदरम्यान माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. अनेकांचा बळी गेला. देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. आता, या जवानाचे घर उभारण्यासाठी मित्रपरिवार आणि बीएसएफमधील सहकारी पुढाकार घेत आहेत.  

बीएसएफकडून सोमवारी जवान मोहम्मद अनिस यांना 10 लाख रुपयांच्या मदतीचा चेक देण्यात आला. दिल्लीतील बीएसएफच्या मुख्यालयात आयजी डी.के. उपाध्याय यांनी मोहम्मद यांच्याकडे हा चेक प्रदान केला, त्यावेळी मोहम्मद यांचे वडिलही उपस्थित होते. दिल्लीतील परिस्थिती अतिशय गंभीर बनली होती, पण आता सर्वच पूर्वपदावर येत आहे. माझ्या सहकारी आणि मित्रांनी मला मदत केली. मी बीएसएफचा एक भाग आहे, हे मी माझं भाग्य समजतो, असे यावेळी मोहम्मद यांनी म्हटले.  

मोहम्मद अनिस हे बीएसएफमध्ये सेवेत असून ते सध्या ओडिशा येथे कार्यरत आहेत. दिल्लीत दंगल भडकल्यावर खजूरी खास परिसरात असलेले अनिस यांचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. दैव बलवत्तर म्हणून अनिस यांचे कुटुंबीय बचावले. मात्र, राहते घरच बेचिराख झाल्याने अनिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. मोहम्मद अनिस यांचा तीन महिन्यांनंतर विवाह होणार आहे. दरम्यान आपल्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटाची माहिती अनिस यांनी आपल्या वरिष्ठांना दिली नव्हती. 

अखेरीस प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमधून ही गोष्ट त्यांच्या वरिष्ठांना समजली. त्यानंतर बीएसएफने आपल्या जवानाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. बीएसएफने एका जवानाच्या माध्यमातून अनिस यांच्या वडिलांशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आज बीएसएफकडून अनिस यांना 10 लाख रुपयांचा चेक देऊन मदत करण्यात आली. दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही अनिस यांना 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सांगितले आहे. तर, घर बांधून देण्यासाठी बीएसएफ जवान आणखी मदत करणार असल्याचे बीएसएफमधील अधिकाऱ्यांनी सांगितलंय.  

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलdelhi violenceदिल्लीHomeघरOdishaओदिशा