शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद; पाकिस्तानकडून बारामुल्लामध्ये गोळीबार

By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 4:24 PM

Pakistan ceasefire Violation: जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाच दिवसांपूर्वी सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान  शहीद झाले आहेत.

दिवाळीच्या आधी पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी कॅप्टनसह चार जवानांनी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना देशासाठी प्राणांची आहुती दिली. आज पुन्हा एकदा बारामुल्लामध्ये पाकिस्तानने केलेल्य़ा गोळीबारात बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद झाले आहेत. 

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. डोवाल शहीद झाले असून आणखी एक जवान जखमी झाल्याचे म्हटले आहे. एलओसीवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु असून बीएसएफचे जवानही त्यांनी चोख प्रत्यूत्तर देत आहेत. राकेश डोवाल हे बीएशएफच्या युद्धसामुग्रीच्या बॅटरी युनिटमध्ये तैनात होते. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून झालेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

 

दुसरा जखमी कॉनस्टेबल वासू राजा यांना गळा आणि हाताला दुखापत झाली आहे. दोघेही शत्रूला प्रत्यूत्तर देण्याच्या मोहिमेवर तैनात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच राजा यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. 

तीन जवान शहीदजम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाच दिवसांपूर्वी सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान  शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत. शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये भारतीय जवान प्राणांची बाजी लावत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे जवान आहेत. संयुक्त मोहिम सुरु असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी रात्रीपासून माछिल सेक्टरमध्ये गस्ती पथकाला संशयस्पद हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवादी मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न करत होते. या वेळी दहशतवाद्यांवर सैन्याने गोळीबार केला. यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून एक एके 47 रायफल आणि 2 बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे खासदार सरदार अयाज सादिक यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये ठिकठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत अयाज सादिक यांचे छायाचित्र असलेली भव्य फलके शनिवारी झळकली. ही फलके सोशल मीडियावरही झळकली आहेत.

पीएमएल-एनचे खासदार अयाज सादिक यांनी आदल्या दिवशी पाकिस्तानच्या संसदेत असे सांगितले होते की,  भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केली नसती, तर त्या दिवशी रात्री भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना त्या बैठकीत यांना चांगलाच घाम फुटला होता आणि त्याचे  पाय लटलटत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही फलके झळकली.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन