काश्मीरमध्ये बीएसएफच्या जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव
By Admin | Updated: March 25, 2015 11:04 IST2015-03-25T10:50:08+5:302015-03-25T11:04:27+5:30
आंतरराष्ट्रीय सीमेवरुन जम्मू-काश्मीरमधील सांबा व कथुआ जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव बीएसएफच्या जवानांनी उधळून लावल्याचे वृत्त आहे.

काश्मीरमध्ये बीएसएफच्या जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २५ - आंतरराष्ट्रीय सीमेवरुन जम्मू-काश्मीरमधील सांबा व कथुआ जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) जवानांनी उधळून लावल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास जवानांना सांबा व कथुआ जिल्ह्यातीस बीएसएफ चौक्यांजवळ संशयास्पद हालचाली आढळल्या. आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून काही लोक बारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचेलक्षात आल्यावर जवानांनी त्या दिशेने तत्काळ गोळीबार केला. त्यामुळे घुसखोरांना माघार घेणे भाग पडले आणि घुसखोरीचा डाव फसला.
गेल्या आठवड्यात सांबा व कथुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्यांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सर्व सीमांवर सर्तक रहाण्याचा इशारा जारी करण्यात आला असून भारतीय जवान डोळ्यांत तेल घालून सीमेवर गस्त घालत आहेत.