शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जय जवान... लग्नाला उरले होते फक्त १७ दिवस, घरी आलं तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 15:41 IST

देशाचं संरक्षण करताना विजय पांडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

फतेहपूर: जम्मू-काश्मीरमध्ये देशाचं रक्षण करताना सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील विजय पांडे यांचा समावेश आहे. 20 जून रोजी विजय यांचा विवाह होणार होता. मात्र ज्या घरात काही दिवसानंतर लगीनघाई पाहायला मिळणार होती, त्या घरात आता आक्रोश ऐकू येत आहे. फतेहपूरमधील सठिगवा गावात विजय पांडे यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. विजय पांडे यांच्या लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकादेखील वाटण्यात आल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अखनूरमध्ये कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानच्या गोळीबारात विजय पांडे शहीद झाले. पांडे यांना रविवारी वीरमरण आलं. यावर्षी आतापर्यंत 18 जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांशी दोन हात करताना हौतात्म्य पत्करलं आहे. तर जवानांच्या कारवाईत आतापर्यंत 80 हून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. बीएसएफचे जम्मू फ्रंटियरचे महानिरीक्षक राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं रात्री सव्वाच्या सुमारास प्रगवालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू केला. पाकिस्तानच्या सैनिकांनी सीमावर्ती भागातील भारतीय चौक्यांना लक्ष केलं. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक एस. एन. यादव आणि कॉन्स्टेबल व्ही. के. पांडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.  

टॅग्स :SoldierसैनिकMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान