शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता देशासाठी नाही कुटुंबीयांसाठी उचलणार शस्त्र, बीएसएफ जवानाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:57 IST

'मला इतकं हतबल करू नका,  मी देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेतलं आहे, पण आता स्वतःच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची वेळ माझ्यावर आली आहे. मी सीमेवर देशाच्या सुरक्षेत असताना...

सहारनपूर : बीएसएफच्या एका जवानावर नाईलाजाने पान सिंह तोमर यांच्या मार्गावर जाण्याची वेळ आली आहे. अजय सिंह असं या जवानाचं नाव असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. सोशल मीडियावर अजय सिंह यांनी एक व्हिडीओ अपलोड करून जर न्याय मिळाला नाही तर देशाच्या सुरक्षेऐवजी स्वतःच्या घराच्या, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची धमकी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या तातारपूर येथील बीएसएफ जवान अजय सिंह हे भारत-बांग्लादेश सीमेवर तैनात असतात. पोलिसांचा जाच -'मला इतकं हतबल करू नका,  मी देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेतलं आहे, पण आता स्वतःच्या घराच्यांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची वेळ माझ्यावर आली आहे. त्यासाठी जबाबदार पोलीस प्रशासन असेल. मी सीमेवर देशाच्या सुरक्षेत असताना माझं कुटुंब मात्र तिकडे धोक्यात जगतंय, असं ते व्हिडीओत म्हणत आहेत.काय आहे प्रकरण -अजय सिंह म्हणाले, त्यांच्या गावाकडच्या जमिनीवर पोलिसांनी जबरदस्ती कब्जा मिळवला. वृद्ध वडिलांना मारहाण करण्यात आली तसंच त्यांना तुरूंगातही टाकलं, कॉलेजमध्ये शिकणा-या बहिणींना नाहक त्रास दिला. गंगोह पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली तोडफोड केली, अखेर आरोपींवर कारवाई का होत नाही, माझी सुनावणी का होत नाहीये असं म्हणत व्हिडीओच्या अखेरीस अजय सिंह यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवरही आरोप लावला आहे. भाजपा सरकार जवनांच्या मागण्या ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.  

पाहा व्हिडीओ -

  

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ