शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:35 IST

]म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे.

नवी दिल्ली  -  म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे. त्याबरोबरच आसाममध्ये रोहिंग्यांनी घुसखोरी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आसाममध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.  बीएसएसफने पश्चिम बंगालला लागून असलेल्या भारत आणि बांगला देशच्या सीमेवर रोहिंग्या मुस्लिमांची अवैध घुसखोरी रोखण्यासाठी गस्त वाढवली आहे. बीएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण बंगाल) पीएसआर अंजनेयुलू यांनी सांगितले की, "याआधी आम्ही घुसखोरी होण्याची शक्यता असलेली 22 ठिकाणे निश्चित केली होती. आता मात्र या ठिकाणांची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात आली आहेत. ही ठिकाणे संवेदनशील आहेत. या ठिकाणांहून बांगलादेशी आणि रोहिंग्या, दोघेही सीमा पार करून भारतात घुसखोरी करू शकतात, त्यामुळे आम्ही, गस्त वाढवली आहे." बीएसएफने संवेदनशील घोषित केलेल्या क्षेत्रांमध्ये पेत्रापोल, जयंतीपूर, हरिदासपूर, गोपालपारा आणि तेतुलबेराई यांचा समावेश आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांत 175 रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यातील सात रोहिंग्यांना याचवर्षी अटक करण्यात आली आहे. रोहिंग्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी बीएसएफकडून आपल्या स्थानिक सूत्रांमध्ये वाढ करण्यात येत आहे. तसेच विविध केंद्रीय यंत्रणांसोबत बीएसएफ काम  करत आहे.  भारताची बांगलादेशला लागून असलेली एकूण सीमा 4 हजार 096 किमी एवढी आहे. त्यापैकी तब्बल 2 हजार 216 मीटर सीमा एकट्या पश्चिम बंगालला लागून आहे. रोहिंग्या निर्वासितांबाबत सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडताना केंद्र सरकारने त्यांचा उल्लेख अवैध प्रवासी असा केला होता. तसेच त्यांचे भारतात येऊन वास्तव्य करणे देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितसे होते. बंगालप्रमाणेच आसाममध्येही रोहिंग्या निर्वासितांची अवैध घुसखोरी रोखण्यासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आसाम पोलिसांनी हायअलर्टची घोषणा केली आहे. रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या तीन भारतीय दलालांना  त्रिपुरामधील सोनापूर येथे अटक करण्यात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याआधी आसाम त्रिपुरा सीमेवर सहा संशयित रोहिंग्यांना ताब्यात घेण्यात आले होते.  

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतRohingyaरोहिंग्या