कॉन्स्टेबलकडून बीएसएफ सहायक कमांडंटची हत्या
By Admin | Updated: May 7, 2014 02:31 IST2014-05-06T18:24:07+5:302014-05-07T02:31:45+5:30
भारत- पाक सीमेवरील रतोकी चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका कॉन्स्टेबलने मंगळवारी कथितरीत्या आपल्या सहायक कमांडंटची गोळ्या घालून हत्या केली.

कॉन्स्टेबलकडून बीएसएफ सहायक कमांडंटची हत्या
अमृतसर : भारत- पाक सीमेवरील रतोकी चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका कॉन्स्टेबलने मंगळवारी कथितरीत्या आपल्या सहायक कमांडंटची गोळ्या घालून हत्या केली़ एका वरिष्ठ अधिकार्याने ही माहिती दिली़
कॉन्स्टेबलचे नाव अनिल कुमार असे असून गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता़ त्याचे सहायक कमांडंट जे़पी़ पांडे यांनी त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाचा आरोप करीत अहवाल दाखल केला होता़ यामुळे संतापलेल्या अनिल कुमारने पांडेंवर पाच गोळ्या झाडल्या़ यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला़
सहायक कमांडंटची हत्या केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पोबारा केला़ घटनास्थळापासून काही दूर अंतरावरील त्याचे सहकारी त्याला पकडण्यासाठी धावले़ मात्र, अनिल कुमारने त्यांच्या दिशेने गोळीबार करीत पळ काढला़ यानंतर ताबडतोब संपूर्ण भागाची घेरावबंदी करण्यात आली व अनिल कुमारला पकडण्यात आले़ आरोपी राजस्थानातील रहिवासी आहे़ तथापि, त्याचे कुटुंब उत्तराखंडमध्ये राहते़ त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे़ (वृत्तसंस्था)