शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यांपूर्वी सत्ता सोडणारे पुन्हा 'सिंहासना'वर, येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:36 IST

मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद

बंगळुरु: प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तीनच दिवसांपूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळलं. यानंतर आज येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात त्यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. येडियुरप्पांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचं सरकार बहुमत सिद्ध करु न शकल्यानं तीनच दिवसांपूर्वी कोसळलं. यानंतर आज येडियुरप्पांनी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येडियुरप्पा यांना ३१ जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. कर्नाटक विधानसभेतील सध्याची सदस्य संख्या २२२ इतकी आहे. १७ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यातील ३ आमदारांना कालच विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं. त्यामुळे आता १४ आमदारांच्या राजीनाम्यावरील निर्णय प्रलंबित आहे. येडियुरप्पांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ११२ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. यामध्ये बंडखोर आमदारांची भूमिका महत्त्वाची असेल. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे बहुमत सिद्ध करताना भाजपाला काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांची आवश्यकता भासेल. या आमदारांनी येडियुरप्पांच्या बाजूनं मतदान केल्यास किंवा बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित राहिल्यास भाजपाला मदत होईल. 

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा