छोटा राजन बहिणींसोबत साजरी करणार भाऊबीज ?
By Admin | Updated: November 13, 2015 14:05 IST2015-11-13T10:19:10+5:302015-11-13T14:05:25+5:30
दिल्लीत सीबीआयच्या अटकेत असलेल्या छोटा राजनला भाऊबीजेला भेटण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज छोटा राजनच्या बहिणींनी दिल्लीतील कोर्टात केला आहे.

छोटा राजन बहिणींसोबत साजरी करणार भाऊबीज ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - दिल्लीत सीबीआयच्या अटकेत असलेल्या छोटा राजनला भाऊबीजेला भेटण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज छोटा राजनच्या बहिणींनी दिल्लीतील कोर्टात केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली असता यासंबंधीचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सीबीआयकडे दिले आहेत.
तब्बल २७ वर्षांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन भारतात परतला असून सध्या तो दिल्लीत सीबीआयच्या ताब्यात आहे. राजनच् ा दोन्ही बहिणी मुंबईत राहत असून भाऊबीजेला भावाची भेट व्हावी यासाठी दोघींनीही प्रयत्न सुरु केले आहेत. सुनीता चव्हाण आणि शालिनी सकपाळ यांनी दिल्लीतील पटियाला कोर्टात भाऊबीजेला राजनला भेटता यावे यासाठी अर्ज केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. 'आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भावाला भेटलेलो नसून आता भाऊबीजेला त्याची भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या आहेत' असे या अर्जात म्हटले आहे. या अर्जावर आज सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी झाली. कोर्टाने सीबीआयने ही भेट घडवणे शक्य आहे का हे तपासून अर्जावर अंतिम निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.