‘भाई एकदम फिट आहे’

By Admin | Updated: April 30, 2017 05:27 IST2017-04-30T05:27:29+5:302017-04-30T05:27:29+5:30

‘भाई एकदम मस्त आणि फिट आहे’, असे सांगत छोटा शकीलने ‘मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम याच्या प्रकृतीविषयी पसरलेल्या बातम्यांचे शनिवारी खंडन केले.

'Brother is absolutely fit' | ‘भाई एकदम फिट आहे’

‘भाई एकदम फिट आहे’

मुंबई : ‘भाई एकदम मस्त आणि फिट आहे’, असे सांगत छोटा शकीलने ‘मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम याच्या प्रकृतीविषयी पसरलेल्या बातम्यांचे शनिवारी खंडन केले.
पाकिस्तानमध्ये कराचीत असलेल्या दाऊदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे व त्याला आगाखान हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे, अशा बातम्या शुक्रवारी पसरल्या होत्या. काही बातम्यांमध्ये तर कदाचित दाऊदचे निधन झाले असावे, अशी शक्यताही वर्तविली गेली होती. या पार्श्वभूमीवर कराचीहून फोन करून दाऊदचा उजवा हात मानला जाणाऱ्या छोटा शकीलने ‘भाई’ची ख्यालीखुशाली सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले. सर्व बातम्या पूर्णत: खोट्या आहेत आणि ‘भाई’ एकदम फिट असल्याचे छोटा शकील म्हणाला, असे या बातमीत नमूद केले गेले.
एवढेच नव्हे तर ‘आता माझ्या आवाजावरून भाईचे असे काही झाले असेल, असे तुम्हाला वाटते का?, असेही शकीलने विचारल्याचा दावा या वृत्तपत्राने केला. (विशेष प्र्रतिनिधी)

Web Title: 'Brother is absolutely fit'