युद्ध नौकेवरून ब्रrाोसची चाचणी
By Admin | Updated: June 10, 2014 00:31 IST2014-06-10T00:31:18+5:302014-06-10T00:31:18+5:30
भारताने आज 29क् किमी अंतरार्पयत मारा करण्याची क्षमता असलेल्या ब्रrाोस सुपरसोनिक जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी घेतली.

युद्ध नौकेवरून ब्रrाोसची चाचणी
>नवी दिल्ली : भारताने आज 29क् किमी अंतरार्पयत मारा करण्याची क्षमता असलेल्या ब्रrाोस सुपरसोनिक जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी घेतली. कर्नाटकच्या कारवार किनारपट्टी येथे स्वदेशी बनावटीचे सर्वात मोठे युद्धजहाज आयएनएस कोलकातावरून ही चाचणी घेण्यात आली.
माझगाव डॉकयॉर्ड लि.ने तयार केलेले आयएनएस कोलकाता अद्याप नौदलात सामील झालेले नाही. या जहाजावरून एकाचवेळी 16 ब्रrाोस क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकतात.
आयएनएस कोलकाता हे प्रोजेक्ट 15-अल्फा मालिकेतील नवीन जहाज आहे. आज सकाळी कारवारच्या किनारपट्टीवर आयएनएस कोलकतावरून क्षेपणास्त्रची चाचणी घेण्यात आली, असे संरक्षण मंत्रलयाच्या अधिका:यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)