शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा मोडणार नाही", राहुल गांधींचा आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:05 IST

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

गुवाहाटी :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'ला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत त्याठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. 

या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "बजरंग दल याच मार्गाने गेला होता. याच मार्गावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅलीही झाली होती. येथे एक बॅरिकेड होते, आम्ही बॅरिकेड तोडले पण कायदा मोडणार नाही. आम्हाला कमकुवत समजू नका. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आहे. आसाममधील लोकांना दडपले जात आहे. विद्यार्थ्यांसोबत मला चर्चा करू दिली जात नाही. काँग्रेस कार्यकर्ते हे भाजप आणि आरएसएसला घाबरत नाहीत."

पुढे राहुल गांधी म्हणाले, "मला माहित आहे की अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास सांगितले जात आहे, पण न्याय मिळाला पाहिजे. आम्ही तुमच्याशी लढायला आलो नाही, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आसाममधील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी लढण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.'' तत्पूर्वी खानापारा येथील गुवाहाटी चौकात मोठा जनसमुदाय जमला आणि ढोल-ताशांच्या गजरात राहुल गांधींचे स्वागत करण्यात आले. आसाम काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह म्हणाले, 'आम्ही बॅरिकेड्स तोडून जिंकलो आहोत.' 

काँग्रेसच्या यात्रेला शहरात बंदीमिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक कोंडीच्या कारणास्तव भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटी शहरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. तरी देखील खानापारा येथील गुवाहाटी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने चौकात मोठी गर्दी झाली. कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात राहुल गांधी यांचे स्वागत केले आणि शहरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले, लाठीचार्जही केला. या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशया घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आसाम पोलिसांना दिले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना मुख्यमंत्र्यांनी हे आसामी संस्कृतीचा भाग नसल्याचे म्हटले आहे. आमचे शांतताप्रिय राज्य आहे. अशाप्रकारचे नक्षलवादी डावपेच आमच्या संस्कृतीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. राहुल गांधी यांच्यामुळे गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे पोलिसांना राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAssamआसाम