शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

धक्कादायक...! इंग्रजांनी भारताकडून तब्बल तीन हजार लाख कोटींची संपत्ती लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 09:19 IST

मेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इंग्रजांवर गंभीर आरोप केला होता.

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इंग्रजांवर गंभीर आरोप केला होता. इंग्रजांनी भारताला 200 वर्षे ओरबाडले आणि तब्बल तीन हजार लाख कोटींची संपत्ती लुटल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी हा आकडा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ उत्सव पटनायक यांच्या शोधनिबंधामधून घेतला आहे. गेल्या वर्षी हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. 

या अहवालानुसार 1765 ते 1938 दरम्यान इंग्रजांनी भारतातून 45 ट्रिलियन डॉलरची संपत्ती लुटली होती. ब्रिटिश शासन काळात भारतातील एक्सचेंज रेट 4.8 अमेरिकी डॉलर प्रति पाऊंड होता. भारतातून जो पैसा ब्रिटनने चोरला तो हिंसाचारासाठी वापरण्यात आला. 1840 मध्ये चीनी घुसखोरी आणि 1857 मध्ये विद्रोह आंदोलनाला दाबण्यासाठी योजना बनविण्यात आली आणि यासाठीचा पैसाही भारतीयांकडून कर रुपात उकळण्यात आला. भारताच्या पैशांतूनच ब्रिटन अन्य देशांमधील लढाया लढत होता आणि कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या देशाचा विकास करत होता. 

या भ्रष्ट व्यवस्थेमुळे भारतावर मोठा परिणाम झाला. जगासाठी भारत चांगला व्यवसाय करत होता, चांगला नफा कमावत होता. मात्र, इंग्रजांनी पुढील तीन दशके देश चालवू शकतील एवढा खजिना लुबाडला होता. भारताचा नफा ब्रिटेन लुटून नेत होता. जेव्हा भारतात 1847 मध्ये ब्रिटिशांनी ताबा घेतला तेव्हापासूनच नवीन टॅक्स आणि बाय सिस्टिम सुरू करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीचे काम कमी झाले आणि भारतीय व्यापारी स्वत:च निर्यात करण्यासाठी तयार झाले. या व्यापाऱ्यांना विशेष काऊन्सिल बिलाचा वापर करावा लागायचा. हे एक वेगळे पेपर चलन होते, जे केवळ ब्रिटिश क्राऊनद्वारेच स्वीकारली जात होती. सोने किंवा चांदीच्या बदल्यात लंडनमध्येच ते घेता येत होते. 

जेव्हा हे बिल इंग्रजांकडे व्यापारी घेऊन जायचे तेव्हा त्यांना ते इंग्रजांकडून ते कॅश करावी लागत होती. या बदल्यात रुपये मिळायचे. ही तीच रक्कम होती जी व्यापाऱ्यांकडूनच टॅक्स म्हणून वसूल केलेली असायची. म्हणजेच व्यापाऱ्यांचा पैसा त्यांना परत दिला जात होता. मात्र, ते पेपर चलन घेण्यासाठी सोने, चांदी द्यावे लागत होते. याचाच अर्थ इंग्रजांना फुकटात सोने, चांदी मिळत होते आणि व्यापाऱ्यांना वाटायचे की हा पैसा त्यांनी कमावलेला आहे. शिवाय मालही कमी किंमतीत इंग्रजांना मिळत होता. हा माल ते इतर देशांत विकत होते. अशा प्रकारे लाखो कोटींचा नफा इंग्रजांनी लुटला. यामुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आणि इंग्रज मालामाल झाले.  

टॅग्स :Englandइंग्लंडIndiaभारतAmericaअमेरिका