शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

ब्रिटीश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आता तरी माफी मागावी: लंडनचे महापौर सादिक खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:41 IST

लंडनचे महापौर सादिक खान हे सध्या भारत दौ-यावर आहेत. अमृतसर येथे जाऊन त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ब्रिटिशांनी जालियनवाला बाग हत्याकांडासाठी मागी मागावी असं ते म्हणाले. 

अमृतसर: लंडनचे महापौर सादिक खान हे सध्या भारत दौ-यावर आहेत. अमृतसर येथे जाऊन त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ब्रिटिशांनी जालियनवाला बाग हत्याकांडासाठी मागी मागावी असं ते म्हणाले.  ब्रिटिश सरकारने 1919 साली झालेल्या जालियनवाला हत्याकांडासाठी माफी मागायलाच हवी, या घटनेसाठी माफी मागण्याची वेळ आली आहे असं त्यांनी तेथील व्हिजिटर बुकमध्येही लिहीलं आहे. येथे झालेला नरसंहार हा भयानक होता, कोणीही ती घटना विसरू शकत नाहीत असं ते म्हणाले. tribuneindia.com ने याबाबत वृत्त दिलं आहे. 2019 मध्ये जालियनवाला येथे झालेल्या हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. नेमकं काय झालं होतं जालियनवाला येथे -13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर या क्रूर इंग्रज अधिका-याने हा नरसंहार घडवला होता. सरकारने स्थानिक नेते डॉ. सफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात एक निषेध सभा बोलावली होती. लोक संतापलेले होते. लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केला, परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलाविली. या सभेला खूप मोठ्या संख्येने लोक जमले होते. सरकारच्या आदेशाविरुद्ध इतक्या मोठय़ा संख्येने लोक एकत्र आल्याचे पाहिल्यावर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने नि:शस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला.सरकारच्या अंदाजानुसार मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या सुमारे चारशे इतकी होती, परंतु प्रत्यक्षात ती संख्या त्यापेक्षाही मोठी होती. याखेरीज गोळीबारात हजारो जायबंदी झाले होते. जालियनवाला बाग हत्याकांडावेळी पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा होता. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी सरकारने हंटर कमिटी 1 ऑक्टोबर 1919 रोजी नेमली. या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर आणि महात्मा गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदव्यांचा त्याग केला.   

टॅग्स :Sadiq Khanसादिक खानLondon Mayorलंडन महापौरJallianwala Bagh massacreजालियनवाला बाग हत्याकांड