शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:46 IST

केरळमध्ये पाऊस प्रचंड आहे. एअर इंडियाने या विमानाला ठेवण्यासाठी आपला हँगर उपलब्ध केला होता. या विमानाची दुरुस्ती केली जात होती, परंतू ते काही दुरुस्त होऊ शकलेले नाही.

इराण-इस्रायल युद्ध काळात ब्रिटनचे स्टील्थ फायटर जेट F-35 केरळच्या विमानतळावर उतरविण्यात आले होते. याला आता पंधरवडा उलटला तरी देखील ते लढाऊ विमान काही परत जाऊ शकलेले नाही. आता हा तांत्रिक बिघाड ठीक करण्यासाठी ब्रिटीश नेव्हीने ४० इंजिनिअरांची टीम भारतात पाठविली आहे. 

केरळमध्ये पाऊस प्रचंड आहे. एअर इंडियाने या विमानाला ठेवण्यासाठी आपला हँगर उपलब्ध केला होता. या विमानाची दुरुस्ती केली जात होती, परंतू ते काही दुरुस्त होऊ शकलेले नाही. या विमानाच्या संरक्षणासाठी सीआयएसएफ सुरक्षा पुरवत आहे. हे विमान पुन्हा आकाशात झेपावण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतू ते व्यर्थ ठरले आहेत. हायड्रॉलिक बिघाडामुळे हे विमान केरळमध्ये उतरविण्यात आले होते. तिरुअनंतपुरम विमानतळावर हे विमान गेले १४ दिवस उभे आहे. 

काही इंजिनिअर ब्रिटनने पाठविले होते. परंतू, त्यांना हे विमान दुरुस्त करण्यास अपयश आले आहे. यामुळे आता ब्रिटिश अभियंते आणि तज्ञांची ४० सदस्यांची टीम देखील केरळला येत आहे. या विमानाची दुरुस्ती करण्यासाठी ब्रिटनहून एक टो व्हेईकल देखील आणले जात आहे. 

F-35 ला निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ पार्क केल्याबद्दल विमानतळावर पार्किंग शुल्क देखील द्यावे लागू शकते. या विमानाचे कमी इंधनामुळे तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. केरळच्या किनाऱ्यापासून १०० नॉटिकल मैल अंतरावर या ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका आहे, तिथे त्याला जायचे आहे. परंतू उड्डाणच करू न शकल्याने ते शक्य झालेले नाही. रॉयल ब्रिटिश नेव्हीच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग असलेले एफ-३५बी लाइटनिंग II हे ते विमान आहे. भारतीय हवाई दलाने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले, इंधन भरणे आणि लॉजिस्टिक सहाय्य केले आहे.

टॅग्स :fighter jetलढाऊ विमानLondonलंडनKeralaकेरळ