काळा पैशाप्रकरणी आधी पुरावे आणा - स्वित्झर्लंडने भारताला सुनावले
By Admin | Updated: December 7, 2014 16:53 IST2014-12-07T16:49:14+5:302014-12-07T16:53:27+5:30
काळा पैसा परत आणण्यासाठी भारताचे अथक प्रयत्न सुरु असतानाच स्वित्झर्लंडने आधी पुरावे आणा, फक्त चौकशी करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार नाही असे भारताला सुनावले आहे.

काळा पैशाप्रकरणी आधी पुरावे आणा - स्वित्झर्लंडने भारताला सुनावले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - काळा पैसा परत आणण्यासाठी भारताचे अथक प्रयत्न सुरु असतानाच स्वित्झर्लंडने आधी पुरावे आणा,मगच आम्ही सहकार्य करु असे भारताला सुनावले आहे. भारतीय अधिकारी कोणतीही स्वतंत्र चौकशी केल्याशिवाय स्विस बँकांमधील भारतीय खातेधारकांची यादी मागू शकत नाही असेही स्वित्झर्लंडच्या वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत लिनस व्हॅल कॅस्टलमर यांनी रविवारी वृत्तसंस्थेला मुलाखात दिली आहे. यामध्ये त्यांनी काळा पैशाप्रकरणी स्वित्झर्लंडची भूमिका स्पष्ट केली. 'काळा पैशाप्रकरणी आम्ही भारताची चिंता समजू शकतो. या प्रश्नावर आम्हीही भारतासोबत सहकार्य वाढवू इच्छितो' असे कॅस्टलमर यांनी सांगितले. मात्र फसवणुकीच्या प्रकारात भारतानेही आम्हाला पुरावे देणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी स्वतंत्र चौकशी करावी असे कॅस्टलमर यांनी सांगितले. कोणतीही चौकशी न करता फक्त संशयाच्या आधारे भारताने आमच्याकडील खातेधारकांची यादी मागू नये असे त्यांनी स्पष्ट केले.