संसद भवनावरील हल्ला परतवून लावणा:या शहिदांना श्रद्धांजली
By Admin | Updated: December 14, 2014 01:25 IST2014-12-14T01:25:39+5:302014-12-14T01:25:39+5:30
शहिदांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन, राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली़

संसद भवनावरील हल्ला परतवून लावणा:या शहिदांना श्रद्धांजली
नवी दिल्ली : संसदेवर 13 डिसेंबर 2क्क्1 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन, राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली़
संसद भवन परिसरात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथसिंह, लोकसभेचे उपाध्यक्ष एम़ थम्बीदुराई आणि अन्य पक्षांचे नेते व खासदार उपस्थित होत़े संसद हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संसद भवन परिसरात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होत़े
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी टि¦टरवरून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली़ 2क्क्1 मध्ये आजच्याच दिवशी लोकशाहीच्या मंदिराचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान देणा:या हुतात्म्यांना माङो नमऩ त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे मोदींनी आपल्या टि¦टमध्ये म्हटले आह़े
संसद परिसरात 13 डिसेंबर 2क्क्1 रोजी पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता़ या पाचही दहशतवाद्यांना यमसदनी धाडताना, सहा जवानांसह नऊ जण मृत्युमुखी पडले होत़े यावेळी जखमी झालेल्या एका पत्रकाराचा नंतर मृत्यू झाला होता़ एक वर्षानंतर याप्रकरणी अफजल गुरूसह चार आरोपींना अटक करण्यात आली होती़ यापैकी अफजल गुरूला गेल्यावर्षी फाशी देण्यात आली होती़
(लोकमत न्यूज नेटवर्क)