जरीपटक्यात धाडसी घरफोडी
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:08+5:302015-02-13T23:11:08+5:30
तीन लाखांची रोकड, दागिने लंपास

जरीपटक्यात धाडसी घरफोडी
त न लाखांची रोकड, दागिने लंपास नागपूर : खसाळा, जरीपटका येथील आम्रपाली कॉम्प्लेक्समध्ये राहाणारे मोहम्मद आसिम गुलाम रसूल अंसारी (वय ४५) यांच्याकडे धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी येथून तीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. गुरुवारी दुपारी ४ वाजता आसिम आणि त्यांचा परिवार मोमिनपुऱ्यात एका कार्यक्रमाला गेले होते. रात्री ९.३० वाजता परत आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी त्यांच्या घरात अक्षरश: धुडगूस घातला. शयनकक्षातील कपाटात असलेली तीन लाखांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. आसिम यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. ---