शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विनेश फोगट मंथरा! ब्रिजभूषण सिंहांनी स्वतःची तुलना केली प्रभू श्रीरामांशी; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:01 IST

Brij Bhushan Singh: देवाने माझ्यासाठी काही वेगळे काम निर्धारित केले आहे, असे सांगत ब्रिजभूषण सिंह यांनी स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांशी केली आहे.

Brij Bhushan Singh: कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष तथा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात नामांकित पैलवानांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. २३ मे रोजी या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. ब्रिजभूषण यांनी महिला पैलवानांसह, महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका पैलवानांची आहे. मात्र, यातच आता एका कार्यक्रमात बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांशी केली असून, विनेश फोगट मंथरा असल्याचे संबोधले आहे. 

ब्रिजभूषण सिंह यांनी नार्को टेस्ट करण्याचे आव्हान पैलवानांना दिले होते. पैलवानांनी हे आव्हान स्वीकारून सर्वकाही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली लाईव्ह व्हावे, असे म्हटले आहे. यातच ब्रिजभूषण यांनी स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांशी केल्यानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभू रामाला मंथराने १४ वर्षे वनवासाला पाठवले होते. परंतु राम वनवासाला गेले नसते तर काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असल्या. जसे राम कधी केवटाला भेटले नसते, शबरीची बोरे खाल्ली नसती आणि हनुमान आणि सुग्रीवशी त्यांची मैत्री झाली नसती आणि शेवटी पापी रावणाची अंत झाला नसता, असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. 

जे आरोप माझ्यावर झाले आहेत, तसा मी नाही

देवाने माझ्यासाठी काही वेगळे काम निर्धारित केले आहे. मी सगळे असेल परंतु जे आरोप माझ्यावर झाले आहेत, तसा मी नाही, असे ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले. तसेच लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे लोक आत्महत्या करतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या कायद्यामुळे हैराण झाले आहेत. आता या वयात मला दुसरी लढाई लढायची आहे. आम्ही पैलवानांवर करोडो रुपये खर्च केले. जे लोक पाया पडून आशिर्वाद घेत होते, त्यांची भाषा आता बदलली आहे, अशी टीकाही ब्रिजभूषण सिंह यांनी केली आहे. 

दरम्यान, मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना ब्रिजभूषण यांनी पैलवानांवर बोचरी टीका केली. देशातील खरे खेळाडू मैदानात सराव करत असून जे जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत, त्यांचा खेळ संपला असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच आंदोलक पैलवान पुढे जाऊन खेळणार नाहीत, ते आता निवडणुक लढवतील. कुस्ती महासंघात अशा घटना घडल्या असतील तर त्यांनी या आधी प्रश्न का विचारला नाही, असा सवालही त्यांनी केला.

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगट