शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

1971च्या युद्धाचे 'हिरो' मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, 'बॉर्डर'मध्ये सनी देओलनं केली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 16:23 IST

बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे.

नवी दिल्ली- बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्याचा परिचय दिला होता. याच युद्धावर बॉर्डर चित्रपट तयार करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान युद्धात गाजवलेल्या पराक्रमामुळे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांना महावीर चक्रानं गौरविण्यात आलं होतं.ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबीय बालाचौरमधल्या चांदपूरमध्ये वास्तव्याला गेले. 1962मध्ये त्यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते भारतीय लष्करात सामील झाले. 1963मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या पंजाब रेजिमेंट 23व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 1965मध्ये त्यांनी युद्धात सहभाग घेतला. युद्धानंतर जवळपास वर्षभर ते इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर होते. ज्यावेळी पाकिस्ताननं लोंगेवालात हल्ला केला, तेव्हा ते मेजर पदावर कायरत होते आणि ते ब्रिगेडिअर पदावरून सेवानिवृत्त झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971मध्ये युद्ध संपण्याच्या अंतिम टप्प्यात होते. त्याच दरम्यान त्यांना सूचना मिळाली की, पाकिस्तानची एक मोठी सैन्य तुकडी लोंगेवाला चौकीच्या दिशेनं येतेय. लोंगेवाला चौकीची सुरक्षा ज्या सैन्य तुकडीवर होती, त्याचं नेतृत्व कुलदीप सिंह चांदपुरी करत होते.चांदपुरीच्या नेतृत्वात त्यावेळी फक्त 90 जवान आणि जवळपास 30 जवान गस्तीवर होते. 120 सैनिकांचं पाठबळ असतानाही पाकिस्तानच्या सैन्याचा सामना करणं अवघड होतं. चांदपुरींनी ठरवलं असतं तर ते पुढची चौकी असलेल्या रामगड चौकीकडे गेले असते. परंतु त्यांनी लोंगेवाला चौकीची सुरक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रात्री पाकिस्तानकडून हल्ल्याला सुरुवात झाली. पाकिस्तान तोफांमधून गोळ्यांची बरसात करत होता. त्याला भारतीय जवानांनी निडरपणे चोख उत्तर दिलं. भारतीय जवानांनी जीपवर असलेल्या रिकॉइललेस रायफल आणि मोर्टारच्या सहाय्यानं गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानकडे जवळपास 2 हजार जवान होते. तर आपल्याकडे फक्त 100 जवानांची फौज होती. परंतु आपल्या जवानांचं धैर्य मजबूत असल्यानं त्यांनी पाकिस्ताननं रोखून धरलं.पाकिस्तानची मनीषा लोंगेवाला चौकी ताब्यात घेऊन रामगढहून थेट जैसलमेरला पोहोचण्याची होती. परंतु  चांदपुरीच्या नेतृत्वातील सैन्य तुकडीनं त्यांना पुढे येऊ दिलं नाही. त्यानंतर 5 डिसेंबर 1971च्या पहाटेच भारतीय जवानांच्या मदतीला हवाई दल आलं. हवाई दलानं विमानातून हल्ला करत पाकिस्तानचे टँक आणि सैन्याला उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला मागच्या मागे पळून जावं लागलं. 6 डिसेंबरला भारतीय हवाई दलाची हंटर विमानं पाकिस्तानवर अक्षरशः तुटून पडली आणि पाकिस्तानच्या सैन्याला पूर्णतः नेस्तनाबूत केलं. या हल्ल्यात पाकिस्तानचे 34 टँक उद्ध्वस्त झाले होते. तर जवळपास 500 जवान जखमी झाले होते, तर 200 जवानांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान