1971च्या युद्धाचे 'हिरो' मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, 'बॉर्डर'मध्ये सनी देओलनं केली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 02:50 PM2018-11-17T14:50:58+5:302018-11-17T16:23:40+5:30

बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे.

brigadier kuldip singh chandpuri hero of 1971 longewala battle dies | 1971च्या युद्धाचे 'हिरो' मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, 'बॉर्डर'मध्ये सनी देओलनं केली होती भूमिका

1971च्या युद्धाचे 'हिरो' मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, 'बॉर्डर'मध्ये सनी देओलनं केली होती भूमिका

googlenewsNext

नवी दिल्ली- बॉर्डर चित्रपटात ज्या कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यांचं आज निधन झालं आहे. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्याचा परिचय दिला होता. याच युद्धावर बॉर्डर चित्रपट तयार करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान युद्धात गाजवलेल्या पराक्रमामुळे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांना महावीर चक्रानं गौरविण्यात आलं होतं.

ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबीय बालाचौरमधल्या चांदपूरमध्ये वास्तव्याला गेले. 1962मध्ये त्यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते भारतीय लष्करात सामील झाले. 1963मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या पंजाब रेजिमेंट 23व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 1965मध्ये त्यांनी युद्धात सहभाग घेतला. युद्धानंतर जवळपास वर्षभर ते इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर होते. ज्यावेळी पाकिस्ताननं लोंगेवालात हल्ला केला, तेव्हा ते मेजर पदावर कायरत होते आणि ते ब्रिगेडिअर पदावरून सेवानिवृत्त झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971मध्ये युद्ध संपण्याच्या अंतिम टप्प्यात होते. त्याच दरम्यान त्यांना सूचना मिळाली की, पाकिस्तानची एक मोठी सैन्य तुकडी लोंगेवाला चौकीच्या दिशेनं येतेय. लोंगेवाला चौकीची सुरक्षा ज्या सैन्य तुकडीवर होती, त्याचं नेतृत्व कुलदीप सिंह चांदपुरी करत होते.

चांदपुरीच्या नेतृत्वात त्यावेळी फक्त 90 जवान आणि जवळपास 30 जवान गस्तीवर होते. 120 सैनिकांचं पाठबळ असतानाही पाकिस्तानच्या सैन्याचा सामना करणं अवघड होतं. चांदपुरींनी ठरवलं असतं तर ते पुढची चौकी असलेल्या रामगड चौकीकडे गेले असते. परंतु त्यांनी लोंगेवाला चौकीची सुरक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रात्री पाकिस्तानकडून हल्ल्याला सुरुवात झाली. पाकिस्तान तोफांमधून गोळ्यांची बरसात करत होता. त्याला भारतीय जवानांनी निडरपणे चोख उत्तर दिलं. भारतीय जवानांनी जीपवर असलेल्या रिकॉइललेस रायफल आणि मोर्टारच्या सहाय्यानं गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानकडे जवळपास 2 हजार जवान होते. तर आपल्याकडे फक्त 100 जवानांची फौज होती. परंतु आपल्या जवानांचं धैर्य मजबूत असल्यानं त्यांनी पाकिस्ताननं रोखून धरलं.

पाकिस्तानची मनीषा लोंगेवाला चौकी ताब्यात घेऊन रामगढहून थेट जैसलमेरला पोहोचण्याची होती. परंतु  चांदपुरीच्या नेतृत्वातील सैन्य तुकडीनं त्यांना पुढे येऊ दिलं नाही. त्यानंतर 5 डिसेंबर 1971च्या पहाटेच भारतीय जवानांच्या मदतीला हवाई दल आलं. हवाई दलानं विमानातून हल्ला करत पाकिस्तानचे टँक आणि सैन्याला उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला मागच्या मागे पळून जावं लागलं. 6 डिसेंबरला भारतीय हवाई दलाची हंटर विमानं पाकिस्तानवर अक्षरशः तुटून पडली आणि पाकिस्तानच्या सैन्याला पूर्णतः नेस्तनाबूत केलं. या हल्ल्यात पाकिस्तानचे 34 टँक उद्ध्वस्त झाले होते. तर जवळपास 500 जवान जखमी झाले होते, तर 200 जवानांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: brigadier kuldip singh chandpuri hero of 1971 longewala battle dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.