थोडक्यात बातम्या
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30
बायोमेट्रीक शिधापत्रिकांची नोंदणी

थोडक्यात बातम्या
ब योमेट्रीक शिधापत्रिकांची नोंदणीअहमदनगर: शहरातील अन्नपूर्णा, अंत्योदय, बीपीएल आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी बायोमेट्रीक शिधापत्रिकांची नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे़ लाभार्थींनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी़ नोंदणीसाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक आहे़ येत्या १० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर, या काळात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे़ शहरातील माळीवाडा विभाग, भिंगार, सावेडी आदी परिसरातील धान्य दुकानांत ही नोंदणी केली जाणार आहे़़़़़़ निवासाचा उपयोग विश्रामगृहासाठी कराअहमदनगर: महापालिका आयुक्तांसाठी वसंत टेकडी येथे उभारण्यात आलेल्या निवासस्थानाचा वापर होत नाही़ त्यामुळे निवासस्थानाची दुरवस्था होत आहे़ इमारतीची देखभाल होत नाही़ आयुक्त निवासाचा वापर महापालिकेचे विश्रामगृहासाठी करावा, अशी मागणी नगरसेवक कैलास गिरवले यांनी आयुक्तांकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली आहे़़़़़