थोडक्यात
By Admin | Updated: July 31, 2015 23:02 IST2015-07-31T23:02:37+5:302015-07-31T23:02:37+5:30
थोडक्यात

थोडक्यात
थ डक्यातकनिष्ठ अभियंत्याला शिक्षामुंबई - लाच स्वीकारताना रंगेहाथ गजाआड झालेल्या राजेश सिन्नरकर या महापालिकेच्या एस विभाग कार्यालयातील तत्कालिन कनिष्ठ अभियंत्याला शुक्रवारी विशेष न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. ३ जून २००२ रोजी सिन्नरकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. पुढील तपासात त्यांच्याकडे ३७ टक्के बेहिशोबी मालमत्ता आढळली होती. न्या. ए. एम. कुर्हेकर यांच्या न्यायदालनात सिन्नरकरांविरोधातील खटला चालला. ॲड. संजय सोष्टे यांनी एसीबीच्यावतीने काम पाहिले.मारहाणीत तरूण जखमीमुंबई - वर्सोवा येथील कोळीभवनात काल रात्री दहाच्या सुमारास किरकोळ कारणांवरून दोन मित्रांमध्ये हाणामारी झाली. त्यात शेख नूर इस्लाम अब्दूल सत्तार(३६) हा तरूण जखमी झाला. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनुसार आरोपीने सत्तारला दारूच्या बाटलीने मारहाण केली. जखमी सत्तार लेखक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोबाईल अपडेट करण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.वृद्धासह दोघांना भोसकलेमुंबई - वयोवृद्धासह एका तरूणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नुकतीच घाटकोपरच्या अमृतनगर परिसरात घडली. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा प्रयत्न असा गुन्हा नोंदवून चार आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनुसार पूर्व वैमनस्यातून चार आरोपींनी मेहमूद खान(६०) यांच्या डोक्यात बियरची बाटली घातली. नंतर तुटलेली बाटली त्यांच्या पोटात खुपसली. तर दिलावर उर्फ जावेद खान या तरूणावर चाकूने वार केले. दोघांना उपचारार्थ सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.