थोडक्यात
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:48+5:302015-06-02T00:03:48+5:30
घरात घुसून महिलेवर हल्ला

थोडक्यात
घ ात घुसून महिलेवर हल्ला मुंबई: घरात घुसून महिलेवर हल्ला करत लुटमारीच्या प्रयत्नात असलेल्या कादर बादशाह(४५) या आरोपीला गजाआड केले. हा प्रकार काल धारावीच्या एम. जी. रोड परिसरात राहाणार्या ज्योती पटवा यांच्या घरात घडला. ज्योती व त्यांची बहिण टीव्ही पहात असताना अचानक बादशहा त्यांच्या घरात शिरला. वस्तर्याचा धाक दाखवत त्याने ज्योती यांना मारहाण केली व लुटमार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनी आरडाओरडा केल्याने बादशाहने पळ काढला. पुढे धारावी पोलिसांनी सायन रेल्वे स्थानक परिसरातून बादशहाला अटक केली. बादशहा हा त्याच वस्तीत राहातो. त्याने याआधी अशाचप्रकारचे गुन्हे केले आहेत. तरुणीचा विनयभंगमुंबई - कामावरुन घरी जाणार्या तरुणीची छेड काढणार्या आरोपीला डी.बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. ग्रँट रोड परिसरात राहणारी ही २६ वर्षीय तरुणी शनिवारी सायंकाळी घरी जात होती. याच दरम्यान आरोपी नरेश बेटकर याने तिची छेड काढली. यावेळी तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर रहिवाशांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.