थोडक्यात
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30
बचत गटांना कर्ज वाटप

थोडक्यात
ब त गटांना कर्ज वाटपनांदेड - नांदेड जिल्हा स्वयंसहाय्यता गटांच्या सहकारी पतसंस्थेच्यावतीने डॉ़पी़डी़जोशी पाटोदेकर यांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले़ या कर्जातून महिलांना शिलाई मशिन घेवून देणे, मिर्ची कांडप, हाळद कांडप, पिठाची गिरणी सुरू करणे आदी उद्योग सुरू करण्यास मदत होईल़ वर्षभरात २५ लाख रूपयांचे कर्ज पतसंस्थेच्यावतीने वाटप करण्यात येईल़ रस्त्याच्या कामास प्रारंभनांदेड - प्रभाग १९ मधील पंचशीलनगरच्या सीसी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ गफार खान यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला़ प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले़ असलम चिीवाले, शेख असलम शेख मन्नान यांचाही सत्कार करण्यात आला़ दिपक सातोरे, राहुल कापुरे, सुभाष कोकरे, गणेश सदावर्ते, माधव कापुरे, काकासाहेब डावरे, गंगाधरराव महाबळे, दत्ता बनसोडे, अरविंद कोकरे, सिद्धार्थ हटकर, काशिनाथ महागडे, दिनेश कांबळे, पातोळे, संतोष गव्हारे, नागेश गिरडी यांची उपस्थिती होती़ रक्तदान शिबीरनांदेड - नाम फाऊंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अंकुशराव पिनाटे यांच्या हस्ते करण्यात आले़ डॉग़जानन तोंडेवाड, जिल्हा समन्वय संजय येरमे, अमोल चामे, विजयकुमार बेंबडे, सचिन पेद्देवाड, अमर बयास, शेटे, भरत वलसे, लिंगराम हंडरगुळे, रामेश्वर मुळे उपस्थित होते़ यशस्वीतेसाठी अजय पाटील, संभाजी चोपने, आनंतराव वल्ल्मपले, प्रकाश गिरे पाटील यांनी परिश्रम घेतले़