थोडक्यात

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:33+5:302015-08-16T23:44:33+5:30

सानपाडा स्थानकालगत अंधार

Briefly | थोडक्यात

थोडक्यात

नपाडा स्थानकालगत अंधार
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात विजेचे खांब नसल्याने अंधार पसरत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशांना अंधारातून वाट काढत चालावे लागत आहे. तर अंधाराचा गैरफायदा घेत गैरप्रकार घडण्यापूर्वी त्याठिकाणचा अंधकार दूर करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

कोपरखैरणेत वाहतूक कोंडी
नवी मुंबई : वाशी - कोपरखैरणे मार्गावर कोपरखैरणे सेक्टर १५ येथील नाक्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. रस्त्यालगत होणारी वाहन पार्किंग त्याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍यांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी वाहनांची ठोकर लागून पादचार्‍यांचे अपघातही त्याठिकाणी झाले आहेत.

Web Title: Briefly