थोडक्यात....
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:25+5:302014-12-18T22:39:25+5:30
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

थोडक्यात....
त लुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनकळमेश्वर : स्थानिक पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात आयोजित प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृती सादर केल्या. विज्ञान प्रदर्शनातील प्राथमिक गटात जे.एस. डब्ल्यु इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. गोंडखैरी येथील ब्राईट स्टार कॉन्व्हेंटला द्वितीय पुरस्कार मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती विभा निंबाळकर, उपसभापती नरेंद्र पालटकर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे बक्षीस वितरण आ. सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)......सिकलसेल नियंत्रण सप्ताहवाडी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जि. प. आरोग्य विभागातर्फे सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक विमलताई तिडके विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना कोलवाडकर होत्या. यावेळी व्याहापेठ आरोग्य केंद्रातील स्वयंसेविका रेखा कांबळे व शिक्षक उपस्थित होते. सिकलसेल कसा जाणून घ्यावा, आजाराची लक्षणे, तपासणी व त्यावरील उपचार या संदर्भात स्वयंसेविका रेखा कांबळे यांनी माहिती दिली. मुला-मुलींचे लग्न करण्यापूर्वी त्यांची रक्त तपासणी कराव्यात याव्यात, असेही त्यांनी सुचविले. कार्यक्रमास सुधाकर धिरडे, अनिल धोटे, किशोर गरमळे, वंदना पाटील, संदीप लापकाळे, श्रावण ठवंगाळे, शीतल अवझे, अश्विनी फलके, मारोती कडू, सुरेश फलके, सुरेखा घागरे आदींनी सहकार्य केले. संचालन माया रामटेके यांनी केले. (प्रतिनिधी)