थोडक्यात जोड....
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:43+5:302014-12-18T00:40:43+5:30
वग येथे एड्स नियंत्रण रॅली

थोडक्यात जोड....
व येथे एड्स नियंत्रण रॅलीमांढळ : नजीकच्या वग येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व बालाजी पाटील हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची एचआयव्ही नियंत्रण व प्रतिबंधात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागपूर येथील इफीकोर स्वयंसेवी संस्थेद्वारे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची गावात प्रभातफेरी काढून एचआयव्ही आजाराबाबत जनजागृती केली. पाटील हायस्कूल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी अक्षय नंदा यांनी एचआयव्हीची लक्षणे, लागण व उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. यावेळी विशाल सरदार, मनीष रायबोरडे, धनरेषा फुलमाळी, मुख्याध्यापक पुरुषोत्तम राघोर्ते, सज्जन पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी).....हत्तीरोग दुरीकरण मोहीमहिंगणा : तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण मोहिमेची नुकतीच सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी परिसरात पंचायत समिती सभापती रेखा कळस्कर यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ झाला. डिगडोह येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी ममता सोनसरे, वैद्यकीय अधिकारी सुरेखा सेलोकर, डॉ. जयश्री घोडके, आरोग्य सहायक देशपांडे, के. एम. राऊत, नवघरे, भोले, आरोग्य सेवक एन. एस. धावडे, जे. यु. जांभुळकर, एच. बी. मेंढे, एन. गवळी आदींची उपस्थिती होती. प्रसंगी परिसरातील नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्याचे वाटप करण्यात आले. एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिमेची माहिती अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आदींना देण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांना जननी सुरक्षा योजनेचे धनादेश देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)