संक्षिप्त
By Admin | Updated: February 2, 2015 23:52 IST2015-02-02T23:52:56+5:302015-02-02T23:52:56+5:30

संक्षिप्त
> डॉ. बोरगावकर यांचा सत्कारपुणे विश्वशांती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. प्रभाकर बोरगावकर यांचा आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष डॉ.प्र.चिं.शेजवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. बोरगावकर यांना गौरविण्यात आले. त्यांनी दलित समाजाच्या उत्कर्षासाठी केलेल्या कार्याबद्दल गोवा येथे भारतीय संस्कृती संस्थेने त्यांना पुरस्काराने गौरविले आहे.