संक्षिप्त
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:01+5:302015-01-29T23:17:01+5:30
संक्षिप्त

संक्षिप्त
स क्षिप्तबसफेऱ्या वाढविण्याची मागणीनागपूर : जयताळा ते पारडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु स्टार बसच्या फेऱ्या मात्र हव्या त्या संख्येने होत नाही. त्यामुळे या मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.बजाजनगरातील रस्ता दुरुस्तीची मागणीनागपूर : बजाजनगर ते रामदासपेठ या मार्गावरील डांबरीकरण उखडल्यामुळे वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील खड्ड्यांमुळे अपघाताचादेखील धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.रस्ता रुंदीकरणाची आवश्यकतानागपूर : अंबाझरी तलाव ते विद्यापीठाच्या कॅम्पस परिसर या मार्गावर नागमोडी वळणे आहेत. या मार्गालगतच रहिवाशी भाग असून रस्ता फारच अरुंद असल्याने अपघाताचा धोका आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे.शहरातील अंतर्गत भागात कचराकुंड्या ठेवानागपूर : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक अंतर्गत भागांमध्ये नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत. त्यामुळे कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.धुळीमुळे नागरिक हैराणनागपूर : रेशीमबाग चौकापासून नव्यानेच बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यांवरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या मातीच्या ढिगांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. येथे नियमित सफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.