संक्षिप्त

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:26+5:302014-12-18T22:39:26+5:30

पाकिस्तानी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

Brief | संक्षिप्त

संक्षिप्त

किस्तानी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली
नागपूर : नवीन देसाई निवासी शाळा, उमरेड रोड येथे पेशावर येथील घटनेचा निषेध करून विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक व्ही.जे. शेडमेखे, शोभा ठाकरे, गोपाल मसराम, प्रवीण मुंडले, योगिनी शेडमेखे, नीलिमा कारमोरे, योगेश सुपटकर व खुशाल भुजाडे उपस्थित होते.
रवी बहुउद्देशीय संस्थेचे स्नेहसंमेलन
नागपूर : रवी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष के.पी. सोनेकर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. बक्षीस वितरण जि.प.चे माजी अध्यक्ष विठ्ठलराव टालाटुले यांच्या हस्ते झाले.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवेदन
नागपूर : महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ व विदर्भ अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेने आ. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्फत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे महासचिव सुरेंद्र दंडवते, संदीप हिवरकर, मनोज नायर उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणात वाढ करा
नागपूर : राज्य शासनाने ५२ टक्के ओबीसींचा विचार करावा. आरक्षणाबाबत फेरआढावा समिती स्थापन करून ओबीसी आरक्षणात वाढ करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी केली आहे.
वीज चोरी करणाऱ्यांवर
गुन्हा दाखल करा
नागपूर : विजेच्या खांबावर आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शहर काँग्रेस कमेटीच्या सोशल मीडिया सेलच्यावतीने मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी मंगेश कामोने, वैभव काळे, अजय हटेवार, युगल विधावत आदी उपस्थित होते.
अवैध वाहतुकीवर बंदी घाला
नागपूर : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विदर्भ ऑटोरिक्षाचालक फेडरेशनने अवैध वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केली. यावर रावते यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचे निर्देष दिल्याचे फेडरेशनतर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Brief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.