दिल्लीच्या पीतमपुरा भागात पुलाचा खांब कोसळला, तिघे जखमी
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:11+5:302015-02-13T00:38:11+5:30
नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या पीतमपुरा भागात आज गुरुवारी एका निर्माणाधीन पुलाचा खांब (पिल्लर) कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले़

दिल्लीच्या पीतमपुरा भागात पुलाचा खांब कोसळला, तिघे जखमी
न ी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या पीतमपुरा भागात आज गुरुवारी एका निर्माणाधीन पुलाचा खांब (पिल्लर) कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले़मधुबन चौक आणि मंगोलपुरी यादरम्यान सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली़ पुलाचा पिल्लर अचानक कोसळल्याने या मार्गावरून जाणाऱ्या दोन चारचाकी गाड्या त्याच्या तडाख्यात आल्या़ या गाड्यांचे मोठे नुकसान झाले तसेच गाडीतील तिघे जखमी झाले़ ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत़ तथापि, वृत्त लिहिपर्यंत यासंदर्भात कुणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नव्हता़