४० जणांना लग्न करून फसवणारी वधू गजाआड

By Admin | Updated: November 11, 2014 02:47 IST2014-11-11T02:47:53+5:302014-11-11T02:47:53+5:30

' चट मंगनी और पट ब्याह' ही हिंदी भाषेतली म्हण सर्वांना परीचित आहेच. पण या म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष वागणारे थोडे थोडके नाही तर तब्बल ४० जण फसले आहेत.

The bride who got married to 40 people got away | ४० जणांना लग्न करून फसवणारी वधू गजाआड

४० जणांना लग्न करून फसवणारी वधू गजाआड

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ११ -' चट मंगनी और पट ब्याह' ही हिंदी भाषेतली म्हण सर्वांना परीचित आहेच. पण या म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष वागणारे थोडे थोडके नाही तर तब्बल ४० जण फसले आहेत. राजस्थानमधील दादीया गावात  लग्नानंतर नववधू नैसर्गिक विधीकरता गेली असता परत आलीच नाही, वरपक्षातील मंडळी शोधून दमली आणि सरते शेवटी पोलिसात तक्रार करायला गेली. तिथे गेल्यावर लक्षात आले की आत्तापर्यंत "त्या नववधूने" तब्बल ४० जणांना लग्नकरून फसवले आहे.  
या वधूचे तथाकथीत लग्न जमवण्यामध्ये इतर चार जण सामील होते. यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एक जण फरार असून वधूसह इतरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. यातील एक व्यक्ती गावोगावी जाऊन लग्नाकरता वर शोधत असे लग्न ठरल्यावर रितसर लग्नाचे विधी पार पडल्यावर पैसे व दागिने घेऊन वधू पोबारा करत असे. दादीया गावातील वरपक्षाने तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी या गावाला घेरवा देऊन वधूसह इतर चौघांना अटक केली. ही मंडळी मुलीचे नातेवाईक असल्याचे दाखवत लग्नाची बोलणी करत आणि वरपक्षाला फसवून पसार होत. पोलिसांकडे या टोळीच्या फोटो व्यतिरिक्त कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नव्हती. पण यावेळी पोलिसांना या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. 

 

Web Title: The bride who got married to 40 people got away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.