लाचखोर शिरीष यादवच्या दुधारीतील घरावर छापा

By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:24+5:302015-10-03T00:20:24+5:30

तासभर तपासणी : वडिलोपार्जित घर, शेतजमीन

The bribery raided Shirish Yadav's dusky house | लाचखोर शिरीष यादवच्या दुधारीतील घरावर छापा

लाचखोर शिरीष यादवच्या दुधारीतील घरावर छापा

सभर तपासणी : वडिलोपार्जित घर, शेतजमीन
सांगली : झोपडप˜ी पुनर्वसन प्राधिकरणचा लाचखोर उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष रामचंद्र यादव (४५) याच्या दुधारी (ता. वाळवा) येथील घरावर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) गुरुवारी रात्री छापा टाकला. घराची तासभर झडती घेण्यात आली, पण काहीच आढळून आले नाही.
झोपडप˜ी पुनर्वसन योजनेमध्ये येणारे धार्मिक स्थळ अनधिकृत दाखविण्यासाठी यादवने संबंधित बांधकाम व्यवसायिकाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पाच लाखाचा दुसरा हप्ता स्वीकारताना एसीबीने गुरुवारी यादवला रंगेहात पकडले होते.
एसीबीच्या पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगलीच्या विभागाशी संपर्क साधून त्यांच्या दुधारी येथील घरावर छापा टाकून झडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने रात्री उशिरा छापा टाकून झडती घेतली. यामध्ये यादव याचे वडिलोपार्जित घर व शेतजमीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The bribery raided Shirish Yadav's dusky house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.