लाचखोर मंडलाधिकारी जाळ्यात ------------------
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30
सातारा : शेती खरेदी केल्यानंतर दस्ताची फेरफार पुस्तकात नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी सतीश धनसिंग कदम (५२) याला लाचलुचपतच्या अधिकार्यांनी गुरुवारी दुपारी येथील बसस्थानक परिसरात रंगेहात पकडले.

लाचखोर मंडलाधिकारी जाळ्यात ------------------
स तारा : शेती खरेदी केल्यानंतर दस्ताची फेरफार पुस्तकात नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी सतीश धनसिंग कदम (५२) याला लाचलुचपतच्या अधिकार्यांनी गुरुवारी दुपारी येथील बसस्थानक परिसरात रंगेहात पकडले.संबंधित तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे शेती खरेदी केली आहे. त्याची फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी तक्रारदार बसस्थानकासमोर असलेल्या मंडलाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी मंडलाधिकारी कदम याने तक्रारदाराकडे दहा हजारांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. लाचलुचपतच्या अधिकार्यांनी गुरुवारी दुपारी मंडलाधिकारी कार्यालयात सापळा लावला. यावेळी दहा हजारांची लाच घेताना कदम याला रंगेहात पकडण्यात आले. यानंतर अधिकार्यांनी त्याच्या घरात छापा टाकून घराची झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत घरात तपासणी सुरू होती. (प्रतिनिधी)